शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्यांमधील कटकटीमुळे गेला अवेजचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कटकटीतून पिवळी नदी परिसरात राहणारा अवेज बब्बू पठाण (वय २०) याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कटकटीतून पिवळी नदी परिसरात राहणारा अवेज बब्बू पठाण (वय २०) याचा बळी गेल्याचे उघड झाले आहे. रविवारी रात्री ९ ते १० च्या सुमारास आरोपी शुभम डांगे, जितू राऊत, मयूर नेवारे, आरिफ रमजान खान आणि त्याच्या साथीदारांनी घातक शस्त्राचे घाव घालून अवेजची भीषण हत्या केली होती. या चाैघांना पोलिसांनी अटक केली आहे.

यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपिलनगर, मसाळा टोली भागात राहणारे बब्बू फत्तेखा पठाण (वय ५३) यांच्या शेजारीच आरोपी शुभम डांगे राहतो. बब्बू यांचा मुलगा अवेज (वय २०) याच्यासोबत आरोपी डांगेचा अनेक दिवसांपासून वाद होता. अवेज सेंट्रिंगचे काम कराचया. त्यामुळे घरासमोरच बासबल्ली ठेवत होता. त्यावरून डांगे कुटुंबातील महिला तसेच अवेजच्या कुटुंबातील महिलांचे नेहमी वाद होत होते. शुभम आणि अवेज घरी असले की तेसुद्धा या वादात उडी घ्यायचे. ९ सप्टेंबरला त्यांच्यात असाच कडाक्याचा वाद झाला. अवेज गुन्हेगारी वृत्तीचा असल्याने तो नेहमी आरोपींना धमकावत होता. त्यामुळे शुभमने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यात त्याने त्याचा जावई जितू राऊत आणि साथीदारांनाही सहभागी करून घेतले. त्यानुसार, रविवारी रात्री दारू पिण्याच्या बहाण्याने आरोपी बाहेर पडले. त्यांना अवेज दिसताच त्याच्यासोबत त्यांनी वाद घातला. धोका लक्षात घेऊन अवेज पिवळी नदी चाैकातून पळू लागला. आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला गाठले आणि घातक शस्त्रांचे घाव घालून त्याला ठार मारले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ठाणेदार संजय जाधव, एपीआय सुधीर इंगे आणि सहकाऱ्यांनी धावपळ करून हत्येचा सूत्रधार शुभम डांगे, त्याचा जावई जितू राऊत, मयूर नेवारे आणि आरिफ खान या चाैघांना अटक केली. त्यांचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस मंगळवारी न्यायालयात हजर करून पीसीआरची मागणी करणार आहेत.

----

हैदराबादहून परतला अन् ...

गेल्या वर्षी एका लुटमारीच्या प्रकरणात अवेजला पोलिसांनी अटक करून कारागृहात डांबले होते. तिकडून परतल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला हैदराबादला पाठवून दिले. तिकडे कामधंद्याला लाग अन् तिकडेच राहा, असे त्याचे कुटुंबीय त्याला म्हणायचे. मात्र, अवेज काही दिवसांपूर्वी नागपुरात परतला अन् अखेर आरोपींनी त्याचा जीव घेतला.

----