शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कोंबडीने घेतला महिलेचा बळी

By admin | Updated: August 25, 2015 03:59 IST

कोंबडी हा प्राणी तसा भेकड अन् निरुपद्रवी जीव. ती फारशी कुणाच्या वाट्याला जात नाही. तिच्या पिलांना धोका

नागपूर : कोंबडी हा प्राणी तसा भेकड अन् निरुपद्रवी जीव. ती फारशी कुणाच्या वाट्याला जात नाही. तिच्या पिलांना धोका असल्याचे लक्षात आल्यानंतरच ती दुसऱ्याच्या अंगावर धावून जाते. मात्र हीच कोंबडी कुणाच्या जीवावर उठू शकते, असे म्हटले तर अनेकांना ते अतिशयोक्ती वाटू शकते. परंतु ही अतिशयोक्ती नाही. कोंबडीने एका महिलेचा बळी घेतला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे ५.३० वाजता ही विचित्र घटना घडली. अजनीतील बजरंगनगरात राहणाऱ्या सुकेशिनी योगिराज दहीवले (वय २९) या त्यांची मुलगी तसेच पती योगिराज भजन दहीवले (वय ३९) हिरो होंडा स्प्लेंडरने दीक्षाभूमी येथे जात होते. घराजवळच्या रस्त्यावर अचानक एक कोंबडी त्यांच्या पती योगिराज यांच्या डोक्यावर येऊन बसली. त्यामुळे ते गोंधळले. परिणामी त्यांचे नियंत्रण बिघडून दहीवले परिवार खाली पडला. सुकेशिनी यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांना पडला प्रश्नया विचित्र अपघाताची सर्वत्र चर्चा असून, सुकेशिनी यांच्या मृत्यूला कारणीभूत कोंबडी असल्याचे माहीत असले तरी तिच्याविरुद्ध गुन्हा कसा दाखल करावा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. तूर्त अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.(प्रतिनिधी)माटे चौकात कुत्र्याने केला अनर्थ अशाच प्रकारे २० आॅगस्टच्या रात्री ७.१५ वाजता शशिकांत देवाजी पोफरे (वय ५०, रा. अभ्यंकरनगर) हे आपल्या बजाज पल्सरने जात होते. माटे चौकाजवळ श्रद्धानंद आश्रमच्या विरुद्ध बाजूला अचानक कुत्रा आडवा आल्याने पोकरे यांनी कुत्र्याला वाचविण्याकरिता करकचून ब्रेक दाबले. त्यामुळे दुचाकीचे नियंत्रण बिघडून ते डिव्हायडरवर पडले. गंभीर जखमी झालेल्या पोकरेंना उपचाराकरिता सिम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तेथे रविवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्नेहल विनोद पोकरे (वय २८) यांच्या सूचनेवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.