शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये रोजगार नसल्याने रेल्वेगाड्यात वाढले व्हेंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:07 IST

नागपूर : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे अनेक जण रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकत असून रेल्वेगाड्यात अवैध व्हेंडरची संख्या वाढली ...

नागपूर : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे अनेक जण रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकत असून रेल्वेगाड्यात अवैध व्हेंडरची संख्या वाढली आहे. मागील आठवड्यात रेल्वे सुरक्षा दल, वाणिज्य विभाग आणि आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशन)च्या संयुक्त विद्यमाने केलेल्या कारवाईत ३२ अवैध व्हेंडरवर कारवाई करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे आपली उपजीविका भागविण्यासाठी अनेकांनी रेल्वेत खाद्यपदार्थ विकण्याचा पर्याय शोधून काढला आहे. आऊटरकडील भागातून ते रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ घेऊन चढतात. त्यानंतर प्रवाशांना ते खाद्यपदार्थ विकतात. याची माहिती रेल्वे सुरक्षा दल, वाणिज्य विभाग आणि आयआरसीटीसीला मिळाली. त्यांनी संयुक्तरीत्या अभियान राबवून ३२ अवैध व्हेंडरला अटक केली. यात पेंट्रीकारमधील सहा कामगारांवरही कारवाई करण्यात आली. आयआरसीटीसीच्या यादीत नसलेले खाद्यपदार्थ विकताना ते आढळले. सर्व अवैध व्हेंडरविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४४, १३७ आणि १४७ नुसार गुन्हा दाखल केला. सध्या रेल्वे न्यायालयाचे कामकाज बंद असल्यामुळे पकडलेल्या अवैध व्हेंडरला जामिनावर सोडण्यात आले. न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

............