शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

वासनकरच्या गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करा

By admin | Updated: November 26, 2015 03:19 IST

वासनकर वेल्थ मॅनेजमेंटच्या गैरव्यवहाराची ‘सीबीआय’मार्फत चौकशी व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

हायकोर्टात याचिका दाखल : राज्य शासनाला मागितले उत्तरनागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंटच्या गैरव्यवहाराची ‘सीबीआय’मार्फत चौकशी व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅड. मोहन अरमरकर असे याचिकाकर्त्याचे नाव असून, ते वासनकर कंपनीचे गुंतवणूकदार आहेत. याचिकेत आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर व तपास अधिकारी सुधाकर ढाणे यांना व्यक्तिश: प्रतिवादी करण्यात आले आहे. अन्य प्रतिवादींमध्ये गृह विभागाचे सचिव व पोलीस आयुक्त यांचा समावेश आहे. या प्रकरणात दीपाली मासिरकर व सुधाकर ढाणे यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले नाही. यामुळे गुंतवणुकदारांचे हित धोक्यात आले आहे. त्यांनी कंपनीत गुंतविलेला परिश्रमाचा पैसा परत मिळणे कठीण झाले आहे. परिणामी प्रकरणाची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यात याव्यात व नवीन तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर, सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांनी फसविणारा वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकरसह तीन आरोपींविरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयात चार हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अन्य आरोपींमध्ये प्रशांतचा भाऊ विनय वासनकर आणि साळा अभिजित जयंत चौधरी यांचा समावेश आहे. ९ मे २०१४ रोजी अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणात एकूण नऊ आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ५०६, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये एफआयआर नोंदविला आहे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने वार्षिक ४० ते ५० टक्के व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने, ४८ महिने यासह विविध कालावधीसाठी वेगवेगळ्या आकर्षक योजनांतर्गत मोठमोठ्या रकमांच्या ठेवी स्वीकारल्या. यानंतर कंपनीने मुदत संपल्यानंतर ठेवी परत केल्या नाही व त्यावरील परतावाही दिला नाही. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रशांत कावळे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)