शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

वाराणसी-हल्दिया जलमार्ग रचणार इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 21:12 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे गंगा नदीतील जलवाहतुकीला ‘बूस्टर डोज’ मिळाला आहे. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला आहे. या मार्गातील अनेक अडथळे दूर झाले असून पुढील आठवड्यात जलवाहतुकीच्या क्षेत्राच्या इतिहासातील एक नवे पान लिहिल्या जाणार आहे हे विशेष. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कोलकात्याहून वाराणसीला जलमार्गातून १६ कंटेनर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: यावेळी तेथे उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्देनितीन गडकरींच्या प्रयत्नांमुळे जलवाहतुकीत ‘भगीरथ’ भरारीगंगा नदीत १३०० हून अधिक लांबीचा जलमार्ग होणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे गंगा नदीतील जलवाहतुकीला ‘बूस्टर डोज’ मिळाला आहे. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला आहे. या मार्गातील अनेक अडथळे दूर झाले असून पुढील आठवड्यात जलवाहतुकीच्या क्षेत्राच्या इतिहासातील एक नवे पान लिहिल्या जाणार आहे हे विशेष. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कोलकात्याहून वाराणसीला जलमार्गातून १६ कंटेनर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: यावेळी तेथे उपस्थित राहणार आहेत.

वाराणसी-हल्दिया या देशांतर्गत जलमहामार्गाची घोषणा १९८६ सालीच करण्यात आली होती. पण त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही न होता हा प्रकल्प धूळखात पडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी ते पश्चिम बंगालमधील हल्दिया या १ हजार ३९० किलोमीटर लांबीच्या गंगेतील जलमार्गातून जलवाहतूक सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेकांनी हे केवळ आश्वासनच ठरेल अशी टीका केली होती. अनेक तज्ज्ञांनीदेखील ही बाब अशक्य असल्याचा दावा केला होता. मात्र नितीन गडकरी यांनी याबाबत स्वत: पुढाकार घेतला. या मार्गातील विविध अडथळे दूर कसे होतील याबाबत नियोजनबद्धरीतीने प्रयत्न करण्यात आले.जागतिक बँकेच्या मदतीने सुमारे ५ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आला आहे. टर्मिनलच्या निर्मितीमुळे आता वर्षभर मालवाहतूक जहाज या मार्गावर चालणार आहेत. यामुळे सुमारे २० हजार लोकांना रोजगारदेखील मिळणार आहे. कोलकाता येथून एका शीतपेय कंपनीच्या १२ ‘कंटेनर्स’ना घेऊन ‘एमव्ही आरएन टागोर’ ही बोट निघाली आहे. गंगेतून मजल दरमजल करीत ७ ते ८ नोव्हेंबरपर्यंत ती वाराणसी येथे पोहोचेल आणि १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान या बोटीचे स्वागत वाराणसी येथे करतील.विक्रमी वेळेत ‘टर्मिनल’ची उभारणीवाराणसी येथे विशेष ‘मल्टिमॉडेल टर्मिनल’देखील विकसित करण्यात आले असून पंतप्रधानांच्या हस्ते याचे १२ नोव्हेंबर रोजी लोकार्पण होईल. या ‘टर्मिनल’ची उभारणीदेखील विक्रमी वेळेत पूर्ण झाली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशा जलवाहतुकीस पुन्हा प्रारंभ होत असून केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पाचे हे मोठे यश मानण्यात येते आहे. या जलमार्गामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.हे मोठे यश : गडकरीस्वातंत्र्यानंतर देशातील जलमार्गातून जहाजावर ‘कंटेनर्स’ येणार आहेत. जलमार्ग ही काळाची गरज आहे व त्या हिशेबाने केंद्र सरकारने पावले उचलली. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून हे एक मोठं यश आहे. महत्त्वाचे म्हणजे वाराणसी येथील ‘टर्मिनल’ पूर्ण करण्यासाठी लागलेला कमी वेळ हा देखील एक विक्रमच आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीVaranasiवाराणसी