शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील लुटारूंची टोळी जेरबंद

By admin | Updated: June 12, 2017 02:26 IST

कोराडी महादुला परिसरातील दोन घरांवर धाड घालून गुन्हेशाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील लुटारूंना ताब्यात घेतले.

कोराडीत गुन्हेशाखेची कारवाई : दहशतवादी असल्याच्या चर्चेने सर्वत्र खळबळ : पोलिसांनी केला इन्कारलोकमत न्यूज नेटवर्ककोराडी / नागपूर : कोराडी महादुला परिसरातील दोन घरांवर धाड घालून गुन्हेशाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील लुटारूंना ताब्यात घेतले. दरम्यान, पकडण्यात आलेले संशयित दहशतवादी असल्याचे वृत्त रविवारी सायंकाळी सर्वत्र पसरल्याने तपास यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ते दहशतवादी नाही तर उत्तर प्रदेशमध्ये राहणारे लुटारू आहेत, असा खुलासा केल्याने उलटसुलट चर्चेला विराम मिळाला. कोराडी नजीकच्या महादुला येथील श्रीवासनगरात सुवर्णा सोळंकी आणि भोजराज बोरकर यांची घरे काही अंतरावर आहेत. ६ जूनला सोळंकी यांच्याकडे पाच जण, तर ७ जूनला बोरकर यांच्याकडे पाच जण भाड्याने राहायला आले. घरमालक सोळंकी यांनी त्यांचा पत्ता ठिकाण आणि ओळखपत्र विचारले.संशयास्पद वर्तन सूत्रांच्या माहितीनुसार, खेळणी विकतो, असे सांगणारे हे सर्वजण पहाटे ५ वाजता घराबाहेर पडायचे. सकाळी ८ वाजता ते परत यायचे आणि नंतर स्वत:ला आपल्या खोल्यांमध्ये कोंडून घ्यायचे. तीन-चारच दिवस झाल्यामुळे घरमालक अथवा आजूबाजूच्यांनी त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही.दरम्यान, सोळंकी आणि बोरकर यांच्याकडून पहाटे झालेल्या कारवाईची माहिती कर्णोपकर्णी सर्वत्र पसरली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ७ ते १० दहशतवाद्यांना पकडून नेल्याचे वृत्तही पसरले. परिणामी त्याबाबत वरिष्ठांकडे विचारणा होऊ लागली. या कारवाईची माहिती गुन्हेशाखेव् यतिरिक्त अन्य कुणाकडेच नव्हती. त्यामुळे उलटसुलट चर्चेत भर पडली. सहपोलीस आयुक्त, अनेक उपायुक्त, दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी, एएनओचे अधिकारी अशा सर्वांकडेच विचारणा होऊ लागली. परिणामी तपास यंत्रणांमध्ये खळबळ निर्माण झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी गुन्हे शाखेशी संपर्क केला. त्यानंतर दहशतवादी नव्हे तर उत्तर प्रदेशमधील लुटारूंची टोळी पकडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनीही दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे अफवा असल्याचे सोशल मीडियावर संदेश टाकून स्पष्ट केले.