शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाचा नागपुरात छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोरगरिबांना वेगवेगळे आमिष दाखवून धर्मांतरण करून घेणाऱ्या रँकेटमधील तिघांना उत्तर प्रदेशच्या एटीएसने (दहशतवाद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गोरगरिबांना वेगवेगळे आमिष दाखवून धर्मांतरण करून घेणाऱ्या रँकेटमधील तिघांना उत्तर प्रदेशच्या एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) शुक्रवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. काैसर आलम शाैकत अली खान, प्रसाद रामेश्वर कांबळे आणि भूप्रियबंदो देवीदास मानकर अशी या तिघांची नावे आहेत. ते गणेशपेठ परिसरात लपूनछपून वावरत होते. कांबळे हा मूळचा नागपुरातील रहिवासी आहे. काैसर धनबाद, लोहिचारा (झारखंड) येथील तर भूप्रियबंदो हा चामोर्शी (जि. गडचिरोली) येथील रहिवासी आहे. गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून, त्यांच्या छोट्याछोट्या गरजा पूर्ण करून त्यांचे पद्धतशीर धर्मांतरण करून घेण्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये सुरू होता. एक मोठे रॅकेट त्यात गुंतले होते. गोमतीनगर पोलीस स्टेशनमध्ये धर्मांतर विरोधी कायद्याचा गुन्हा दाखल करून यूपी एटीएसने या रॅकेटचा भंडाफोड केला होता. रॅकेटमधील काहींना अटकही केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून या रॅकेटमधील काही जण नागपुरात लपून असल्याचे यूपी एटीएसला कळले होते. त्यामुळे एटीएसच्या पथकाने शुक्रवारी नागपूर गाठले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन त्यांनी कारवाईसाठी मदत मागितली. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहुल कॉम्प्लेक्समध्ये छापा घातला. येथे २०२ क्रमांकाच्या सदनिकेत लपून असलेल्या काैसर आलम, प्रसाद कांबळे आणि भूप्रियबंदोला जेरबंद केले. त्यांच्याकडून काही महत्वाची कागदपत्रेही आणि चिजवस्तूही जप्त करण्यात आल्या.

---

कारवाईबाबत गोपनीयता

या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. शनिवारी दुपारी ही कारवाई चर्चेला आल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत दुपारपर्यंत फारसे बोलण्यास टाळाटाळ चालवली होती.

---