शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

भूमिगत कोळसा उत्खननासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

By admin | Updated: April 19, 2015 02:25 IST

भूमिगत कोळसा उत्खननासाठी वेकोलिने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याची माहिती वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी कोळसा

नागपूर : भूमिगत कोळसा उत्खननासाठी वेकोलिने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याची माहिती वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांना दिली. तीन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या स्वरूप यानी श्निवारी वेकोलिच्या अदासा भूमिगत कोळसा खाणीचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान अधिकारी त्यांना माहिती देत होते. अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने अदासा खाण ही सर्वश्रष्ठ भूमिगत खाणींपैकी एक आहे. कोल इंडियामधील आपल्या कॅटेगरीमध्ये सर्वाधिक २.३ टन प्रति मॅनशिफ्टआऊटपुट देणारी ही कोळसा खाण आहे. खाणीमध्ये ये-जा करणे सोपे व्हावे यादृष्टीने येथील व्यवस्थापनाने नवीन मॅन राईडिंग सिस्टीम लावले आहे. याची पाहणी सुद्धा स्वरूप यांनी केली. वेकोलीने भूमिगत खाणीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरावर सर्वाधिक जोर दिला असल्याची माहिती सुद्धा त्यांना देण्यात आली. तांडसी खाणीत कंटीन्युअस मायनर टेक्नॉलॉजीचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. भूमिगत खाणीमध्ये पायी प्रवासादरम्यान आणि श्रमिकांचा थकवा कमी करण्यासाठी वेकोलितर्फे ८ खाणीमध्ये ९ मॅन रायडिंग सिस्टीम लावण्याचा प्रयोग केला जात आहे. वित्तवर्ष २०१५-१६ मध्ये वणी नॉर्थ क्षेत्रातील राजूर खाण, पेंच क्षेत्रातील नहेर या खाणीमध्ये सुद्धा ही प्रणाली लावण्याचा विचार सुरू आहे. सुरक्षाव्यवस्था वाढविण्याच्या दृष्टीने ६ खाणींमध्ये टेलिमॉनिटरिंग सिस्टीम लावण्यात आले आहे. इतर नऊ खाणींमध्ये सुद्धा ही सिस्टीम लावण्याचे प्रस्तावित आहे. वेकोलिचे अध्यक्ष व प्रबंध संचालक राजीव रंजन मिश्र, संचालक तांत्रिक एस.एस. माल्ही यांनी स्वरूप यांना सविस्तर माहिती दिली. नागपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक ए.के. मजुमदार हे यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)