शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात मूल्यांकनाचे ‘मॅजिक’?

By admin | Updated: August 4, 2014 00:49 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरळीतपणे संपल्याचे दावे करण्यात येत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र दिव्याखाली अंधारच असल्याचे चित्र आहे.

एलएलबी अभ्यासक्रम : दोन विषयांत विद्यार्थ्यांना ‘सेम टू सेम’ गुणनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरळीतपणे संपल्याचे दावे करण्यात येत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र दिव्याखाली अंधारच असल्याचे चित्र आहे. तीन वर्षीय ‘एलएलबी’च्या चौथ्या सेमिस्टरच्या (सीबीएस) निकालात एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चक्क दोन विषयांत सारखे गुण देण्याची बाब समोर आली आहे. या मागे विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रणालीचे ‘मॅजिक’ आहे की घाईगडबडीत झालेला सावळागोंधळ असा संभ्रम निर्माण झाला आहे. शंभराव्या दीक्षांत समारंभाची तयारी करणाऱ्या विद्यापीठाने अजूनही काही धडा घेतला नाही का असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे. ‘एलएलबी’च्या चौथ्या सेमिस्टरची परीक्षा मे च्या दुसऱ्या पंधरवड्यात संपली. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनंतर २८ जुलै रोजी विद्यार्थ्यांचा निकाल लागला. परंतु संकेतस्थळावर गुणपत्रिका पाहताच विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जे विद्यार्थी परीक्षेत अनुपस्थित होते, त्यांना चक्क गुण देण्यात आले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच चांगले गुण मिळत होते, त्यांना अनुपस्थित दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकमेकांना विचारणा केल्यानंतर त्यांना आणखी एक धक्का बसला. ‘लेबर लॉ-२’ आणि ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ’ या दोन्ही विषयांत विद्यार्थ्याला सारखे गुण देण्यात आले आहेत. म्हणजेच ‘लेबर लॉ-२’मध्ये ४५ गुण असतील तर ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ’ या विषयातही तितकेच गुण आहेत. एक-दोन विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा योगायोग होऊ शकतो. परंतु ६० ते ७० विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेला हा योगायोग की विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा नमुना असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंबंधात संकेतस्थळावर पाहणी केली असता रविवारी संबंधित निकाल काढून घेतला असल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)