शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ दडवतेय गुणवाढ घोटाळा

By admin | Updated: April 26, 2017 01:23 IST

कोहचाडे प्रकरणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची प्रतिमा धुळीस मिळाली होती.

नागपूर : कोहचाडे प्रकरणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची प्रतिमा धुळीस मिळाली होती. २०१२ साली विद्यापीठाच्या सहायक कुलसचिव संध्या चुनोडकर-हांडा यांनी स्वत:च्या मुलाची केलेली गुणवाढ समोर आली आणि विद्यापीठ वर्तुळात याला ‘कोहचाडे-२’ प्रकरण असे संबोधण्यात आले. राजकीय दबावातून बरीच टाळाटाळ झाल्यानंतर अखेर ५ वर्षांनी चुनोडकर यांना सेवेतून बरखास्त करण्यात आले. मात्र अद्यापही या प्रकरणात पोलीस तक्रार का दाखल झालेली नाही. संबंधित प्रकार गंभीर असतानादेखील यासंदर्भात विद्यापीठाने पोलीस तक्रार करण्याचे पाऊल न उचलल्यामुळे विद्यापीठ वर्तुळात विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. जुलै २०१२ मध्ये फेरमूल्यांकनातून गुणवाढ झाल्याचा घोटाळा उजेडात आला होता. विद्यापीठाच्या फेरमूल्यांकन विभागातील सहायक कुलसचिव संध्या चुनोडकर-हांडा यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या मुलाची तीन विषयात फेरमोजणी करून गुणवाढ करवून घेतली होती. हा प्रकार केवळ त्यांच्या मुलापुरता मर्यादित नव्हता तर इतरही अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला, असा आरोप होता. विद्यापीठाने शिस्तपालन समितीद्वारे चौकशी करण्याचा निर्णय घेतला व तेव्हापासून हे प्रकरण समितीकडे होते.परीक्षा मंडळाच्या बैठकीत या अहवालाला मान्यतादेखील देण्यात आली होती व चुनोडकर-हांडा यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती व अधिवक्ता योगेश धाराशिवकर यांच्यामार्फत विभागीय चौकशी करण्यात आली. या समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल तयार केला. चौकशी समितीच्या विद्यापीठ दडवतेय गुणवाढ घोटाळा अहवालानुसार कारवाई करत अखेर पाच वर्षांनंतर संध्या चुनोडकर-हांडा यांना तत्काळ सेवेतून बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र संबंधित कारवाई व चौकशी केवळ एकाच प्रकरणासंदर्भात करण्यात आली होती. चुनोडकर यांनी आणखी इतर विद्यार्थ्यांनादेखील लाभ पोहोचविल्याचा आरोप होता. याबाबत त्यांची चौकशी झाली नाही. जर पोलिसांमार्फत चौकशी झाली असती तर आणखी तथ्य समोर येऊ शकले असते. मात्र नागपूर विद्यापीठाने पोलीस तक्रार करण्याचे पाऊलच उचलले नाही. मुळात हे प्रकरण म्हणजे हिमनगाचे टोक आहे. हा घोटाळा आणखी मोठा असून पोलीस तक्रार न करणे हा घोटाळा दाबण्याचाच प्रकार असल्याचे मत एका माजी प्राधिकरण सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले. अहवालानुसार कारवाई करत अखेर पाच वर्षांनंतर संध्या चुनोडकर-हांडा यांना तत्काळ सेवेतून बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र संबंधित कारवाई व चौकशी केवळ एकाच प्रकरणासंदर्भात करण्यात आली होती. चुनोडकर यांनी आणखी इतर विद्यार्थ्यांनादेखील लाभ पोहोचविल्याचा आरोप होता. याबाबत त्यांची चौकशी झाली नाही. जर पोलिसांमार्फत चौकशी झाली असती तर आणखी तथ्य समोर येऊ शकले असते. मात्र नागपूर विद्यापीठाने पोलीस तक्रार करण्याचे पाऊलच उचलले नाही. मुळात हे प्रकरण म्हणजे हिमनगाचे टोक आहे. हा घोटाळा आणखी मोठा असून पोलीस तक्रार न करणे हा घोटाळा दाबण्याचाच प्रकार असल्याचे मत एका माजी प्राधिकरण सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले. (प्रतिनिधी)