शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानरचनेचा सिद्धांत मांडणारी काव्यक्रांती एकतेची

By admin | Updated: August 11, 2014 00:54 IST

विषमतेची भिंत तोडून, परंपरेच्या सीमा ओलांडनू, जातीयतेची चौकट नष्ट करून, वैचारिक क्रांतीचा परीघ विस्तारित करणारी, ज्ञानरचनेचा सिद्धांत मांडणारी, काव्यक्रांती एकतेची असावी,

सम्यक साहित्य मंच : क्रांतिदिनाला काव्याभिवादन नागपूर : विषमतेची भिंत तोडून, परंपरेच्या सीमा ओलांडनू, जातीयतेची चौकट नष्ट करून, वैचारिक क्रांतीचा परीघ विस्तारित करणारी, ज्ञानरचनेचा सिद्धांत मांडणारी, काव्यक्रांती एकतेची असावी, असे विधान आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले. सम्यक साहित्य मंचच्यावतीने क्रांतिदिनानिमित्त शनिवारी ‘काव्यक्रांती एकतेची’ या विषयावर चर्चा आणि कविता सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रूपाताई कुळकर्णी, डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश खरात उपस्थित होते.डॉ. मनोहर म्हणाले, या मंचमुळे काव्यसागराचे किनारे विस्तारित झाले आहेत. कवींसोबत सामाजिक बांधिलकी जोपासणारे श्रोतेही संघटित होत आहेत. डॉ. कुळकर्णी म्हणाल्या, या कार्यक्रमात कवींनी सामाजिक विसंगतीच्या विकृतींवर प्रकाश टाकला आहे. माणसामाणसात भेद करणाऱ्या संस्कृतीबद्दल निषेधाचा सूर मांडला, तर काहींनी सकारात्मकही बाजू मांडली आहे. यामुळे या मंचावर ‘काव्यक्रांती’ घडून आली आहे.डॉ. खरात म्हणाले, माणसाला केंद्रस्थानी ठेवून आंबेडकरी चळवळीला तेवढ्याच ताकदीने पुढे नेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात सहभागी कवींनी आपल्या कवितेतून केला आहे. संचालन कथालेखिका डॉ. मंजूषा सावरकर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ कवी भाऊ पंचभाई, नीलकांत ढोले, इ.मो. नारनवरे, अमर रामटेके, हृदय चक्रधर, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, मनीषा साधू, हेमलता ढवळे, प्राजक्ता खांडेकर, ज्ञानेश्वर वांढरे, प्रकाश दुलेवाले, प्रसेनजित ताकसांडे, संजय गोडघाटे, मधुकर कडू यांनी एकापेक्षा एक सरस रचना सादर करून क्रांतिदिनाला काव्याभिवादन केले. प्रास्ताविक सम्यक साहित्य मंचचे अध्यक्ष प्रा. हृदय चक्रधर यांनी केले तर आभार प्रकाश दुलेवाले यांनी मानले.(प्रतिनिधी)