शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

संगीत, नृत्याचा अनोखा संगम

By admin | Updated: January 13, 2015 01:07 IST

पारंपरिक शास्त्रीय नृत्य, रागांचे शास्त्रीय संगीत ते सिनेसंगीतापासून थेट रॉक बॅण्ड एकत्र अनुभवण्याचा ‘उडान अ म्युझिकल इव्ह’ हा कार्यक्रम राष्ट्र निर्माण संघटनेच्या वतीने स्वामी विवेकानंद

उडान : अ म्युझिकल फ्युजन इव्ह नागपूर : पारंपरिक शास्त्रीय नृत्य, रागांचे शास्त्रीय संगीत ते सिनेसंगीतापासून थेट रॉक बॅण्ड एकत्र अनुभवण्याचा ‘उडान अ म्युझिकल इव्ह’ हा कार्यक्रम राष्ट्र निर्माण संघटनेच्या वतीने स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्र निर्माण संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात स्थानिक कलावंतांसह मुंबई-पुणे येथील कलावंतांच्या सादरीकरणाचा त्रिवेणी संगम प्रेक्षकांनी अनुभवला. भरतनाट्यम्, क थ्थक या शास्त्रीय नृत्याची जुगलबंदी, अहीर भैरव, पिलू व पुरिया धनश्री या रागांनी मन प्रसन्न करणाऱ्या शास्त्रीय संगीताची अनुभूती, बासरी, हार्मोनियम, पखवाज, तबला व कीबोर्ड या वाद्यवृंदांचा झालेला अनोखा मिलाफ, देशभक्तीपर गीतांंनी भारावलेले वातावरण व स्वामी विवेकानंदांच्या रूपात मंचावर आलेल्या कलाकारांचे नाट्य सादरीकरणाने कार्यक्रम सजत गेला. शास्त्रीय संगीतासह आजच्या पिढीला भावणारे सिनेमासंगीत व रॉकबॅण्डचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाची सुरुवात काव्य अभिनय कला यांचा संगम साधण्याचा प्रयत्न रेशमा सत्यजित यांच्या भरतनाट्यम् व कविता जंग्गम यांनी सादर केलेल्या क थ्थकच्या फ्युजनने झाली. यानंतर मुंबई येथील गायक अभिषेक मारोटकर यांनी शास्त्रीय गायन सादर केले. वाद्यांची जुगलबंदी सादर करण्यात आली. बासरीवर अरविंद उपाध्ये, हार्मोनियमवर संदीप गुरनुले, पखवाजवर श्रीधर कोरडे, तबल्यावर मनीष नवघरे व कीबोर्डवर अक्षय आचार्य यांनी नव्या फ्युजनचा आनंद प्रेक्षकांना दिला. स्वामी विवेकानंदांच्या जीवनचरित्रावर आधारित शुभांगी भडभडे लिखित, अभिजित जोशी दिग्दर्शित, अमित घरत यांचा अभिनय असलेले ‘स्वामी विवेकानंद’ हे लघुनाट्य सादर करण्यात आले. एस.एस. माडखोलकर यांच्या शिष्यांनी सादर केलेले जयोस्तुते या गीतावरील नृत्याने प्रेक्षकांची दाद मिळविली. अभिजित मसराम, श्रीनिधी घटाटे व अभिषेक मारोटकर यांनी मराठी-हिंदी गीते सादर केली. रॉक बॅण्डचे सादरीकरण तरुणाईला थक्क करणारे ठरले. या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन अभिजित जोशी यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर व आसावरी गलांडे यांनी केले. कार्यक्रमाला नृत्यांगना माया जाधव व एस.एस. माडखोलकर राष्ट्र निर्माण संघटनेचे प्रमुख विजय मारोडकर, प्रशांत भारती, नीलेश मारोडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)