शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 60 वा वाढदिवस

By admin | Updated: May 27, 2017 14:08 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी आज वयाची 60 वर्ष पूर्ण करत आहेत. देशात आपला ठसा उमटवणा-या गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देश त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 27 - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी आज वयाची 60 वर्ष पूर्ण करत आहेत.  देशात आपला ठसा उमटवणा-या गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देश त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी 61 दिवे असलेल्या आरतीच्या थाळीनं त्यांचं औक्षण केलं. 
 
यावेळी गिरीश बापट यांनीही गडकरी वाड्यावर जाऊन नितीन गडकरी यांना शुभेच्छा दिल्या.  नितीन गडकीर यांना शुभेच्छा देण्यासाठी गडकरी वाड्याबाहेर कार्यकर्त्यांनीही प्रचंड गर्दी केली आहे. तर ओंकारेश्वर येथून साधू देखील नागपुरात दाखल झाले आहेत.  
 
 

गडकरी यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त  शनिवारी कस्तूरचंद पार्क येथे सायंकाळी 5.30  वाजता त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असणार आहेत. तर आध्यात्मिक संत श्री श्री रविशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह देशभरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. देशभरातील आमदार, खासदार व विविध क्षेत्रातील मान्यवर गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहतील.

या सोहळ्याच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नितीन गडकरी षष्ट्यब्दीपूर्ती गौरव समारोह समिती स्थापन करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे समितीचे संयोजक असून वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी हे सहसंयोजक आहेत.

 
 
 
 
नितीन गडकरी यांच्यासाठी 61 किलोचा केक