शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

५९ भूखंड विकणाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: July 30, 2016 02:23 IST

बनावट अकृषक परवान्यावर उमरेड मार्गावरील कळमना येथील ५९ भूखंड विकून १ कोटी ३५ हजार ५०० रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या....

न्यायालय : एक कोटीवर रकमेने फसवणूक नागपूर : बनावट अकृषक परवान्यावर उमरेड मार्गावरील कळमना येथील ५९ भूखंड विकून १ कोटी ३५ हजार ५०० रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या एका सूत्रधाराचा अटकपूर्व जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे सहायक सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. नरेंद्र हेमंत पराते, असे या सूत्रधाराचे नाव आहे. प्रकरण असे की, नरेंद्र पराते, उमाकांत विठ्ठलराव मेंढे आणि हर्षद प्रभाकर चिखले यांनी हनुमाननगर क्रीडा चौकात ‘घरकुल इन्फ्राटेक’ या नावाने भूखंड विकण्याचे दुकान थाटले होते. त्यांनी उमरेड मार्गवरील कळमना येथील खसरा क्रमांक ११६ आणि पहिला हलका क्रमांक ३६ मधील १ लक्ष ४३ हजार १६१ चौरस फूट जागेवर निरनिराळ्या लांबी व रुंदीचे ५९ ले-आऊट पाडले. प्रत्यक्षात ही जमीन गावठाणापासून ५०० मीटरच्या दूर असून त्याची अकृषक परवानगी मिळत नाही. या आरोपींनी ही जमीन अकृषक करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासचे बनावट सही व शिक्क्यानिशी शिफारसपत्र तयार केले होते. ते जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करून हे शिफारसपत्र आणि अकृषकचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजात समाविष्ट करण्यात आला होता. त्यावर अकृषकचा परवाना प्राप्त करून या अकृषक परवान्याचा आधार घेऊन त्यांनी भूखंड विकण्याचा सपाटा सुरू केला होता. या गैरप्रकारात नासुप्र आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आरोपींनी महाल येथील अनंता मनोहर राहाटे यांना प्लॉट नंबर ४ हा २ हजार ४२१ चौरस फुटाचा भूखंड विकण्याचा सौदा करून त्यांच्याकडून ३ लाख ३०० रुपये घेतले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावर १५ जून रोजी भादंविच्या ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४०६, ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी ५९ भूखंड विकून रीतसर रजिस्ट्री करून देऊन शासनाची आणि भूखंड घेणाऱ्यांची फसवणूक केली आहे. आरोपींपैकी नरेंद्र पराते याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. प्रकरण गंभीर असल्याने त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील मदन सेनाड यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)