शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

दोन महिलांची जन्मठेप रद्द

By admin | Updated: May 30, 2015 02:49 IST

नातेवाईकाच्या खुनात चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनावलेली दोन महिला आरोपींची जन्मठेप उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने रद्द करून ...

नागपूर : नातेवाईकाच्या खुनात चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनावलेली दोन महिला आरोपींची जन्मठेप उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने रद्द करून त्यांची निर्दोष सुटका केली. याच प्रकरणातील अन्य दोघांची जन्मठेप रद्द करून त्यांना भादंविच्या ३२४ मध्ये दोषी धरले. ते जेवढे दिवस कारागृहात होते, तेवढी शिक्षा पुरेशी आहे,असे न्यायालयाने आदेशात नमूद त्यांना ताबडतोब सोडण्याचा आदेश दिला. हिराबाई ब्राह्मणे, लोपाबाई ब्राह्मणे, महेंद्र ब्राह्मणे आणि सहादेव ब्राह्मणे, अशी आरोपींची नावे असून राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निम्मी येथील रहिवासी आहेत. भारत खाडे, असे मृताचे नाव होते. खुनाची घटना १० जून २०१० रोजी घडली होती. प्रकरण असे की, महेंद्र ब्राह्मणे याची नातेवाईक जिजा हिचा विवाह घटनेच्या १५ वर्षांपूर्वी भारतसोबत झाला होता. घटनेच्या तीन वर्षांपूर्वी ती भारतला सोडून निघून गेली होती. दरम्यान तिने स्वत:ची जमीन महेंद्रच्या नावे करून दिली होती. ही बाब समजताच तो निम्मी गावात गेला होता. त्याचे आरोपींसोबत भांडण होऊन त्यांनी काठी आणि मुसळाने प्रहार करून त्याचा खून केला होता. चंद्रपूर सत्र न्यायालयाने चौघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला त्यांनी उच्च न्यायालयात अ‍ॅड. राजेंद्र डागा यांच्यामार्फत आव्हान दिले होते. मृताच्या शरीरावर १८ जखमा होत्या. त्या नाजूक भागावर नव्हत्या, त्यामुळे या जखमा मृत्यूस कारण ठरू शकत नाही. त्याचा मानसिक धक्क्याने मृत्यू झाला असावा, असा बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. (प्रतिनिधी)