शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

जन्मठेप झालेल्या दोन महिलांना जामीन

By admin | Updated: April 20, 2015 02:12 IST

हायकोर्ट : सासूने मुलीच्या मदतीने केला होता जावयाचा खून

नागपूर : जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध दोन महिला आरोपींनी दाखल केलेले फौजदारी अपील उच्च न्यायालयाचे न्या. ए. बी. चौधरी आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी स्वीकारून त्यांना जामीन मंजूर केला. न्यायालयात आरोपींच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी काम पाहिले. लीलाबाई बाबूराव थोरात रा. नेरपिंगळई आणि आम्रपाली गोपाल वरघट रा. केकतपूर, अशी आरोपी महिलांची नावे आहेत. या दोघीही मायलेकी आहेत. लीलाबाईने आपली मुलगी आम्रपाली हिचा विवाह अमरावती जिल्ह्याच्या केकतपूर येथील गोपाल वरघट याच्यासोबत करून दिला होता. काही दिवसानंतर गोपाल याला सासरच्या लोकांनी उसने पैसे दिले होते.परंतु तो पैसे परत करीत नव्हता. १२ नोव्हेंबर २०१० रोजी तो आपली पत्नी आम्रपाली हिला सोबत घेऊन नेरपिंगळई येथे गेला होता. लीलाबाई, आम्रपाली या दोघींनी गोपालचा गळा दाबून खून केल्यानंतर मृतदेह घरामागील एका खड्ड्यात पुरला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना लीलाबाईचा अल्पवयीन मुलगा आणि पती बाबूराव यांनी मदत केली होती. मुलगा घरी परतला नाही म्हणून गोपालची आई लक्ष्मीबाई वरघट हिने २९ नोव्हेंबर २०१० रोजी शिरखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.तपासात हा खून उजेडात आला होता. त्यामुळे चार आरोपींविरुद्ध भादंविच्या ३०२, २०१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमरावती सत्र न्यायालयाने या दोन्ही महिलांना जन्मठेप तर बाबूराव याला ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध त्यांनी अपील दाखल केले. (प्रतिनिधी)