शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

भरधाव कारचालकांनी घेतले दोन बळी

By admin | Updated: April 20, 2015 02:13 IST

भरधाव कारचालकांनी दोन वेगवेगळ्या अपघातात दोन मुलांचे बळी घेतले. वाडी आणि नंदनवनमध्ये हे अपघात घडले.

नागपूर : भरधाव कारचालकांनी दोन वेगवेगळ्या अपघातात दोन मुलांचे बळी घेतले. वाडी आणि नंदनवनमध्ये हे अपघात घडले.अन्मय ज्योतिसिंग रवींद्रसिंग काला (वय ११, रा. वडधामना, सुराबर्डी) हा बालक रविवारी दुपारी १.३० वाजता वाडी गुरुद्वाराजवळ रस्ता ओलांडत होता. तेवढ्यात त्याला एमएच ३४/एएम ४५७८ क्रमांकाच्या कारचालकाने जोरदार धडक मारली. अन्मय गंभीर जखमी झाला. त्याला डॉक्टरकडे नेले असता मृत घोषित केले. या अपघातामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. अपघातानंतर दोषी कारचालक पळून गेला. गुरुमितसिंग अविनाशसिंग काला (वय ४५) यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी दोषी कारचालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी आरोपी कारचालकाला अटक केलेली नव्हती. नंदनवनमधील अपघात १४ एप्रिलच्या सायंकाळी ६ च्या सुमारास झाला होता. हरीश शैलेंद्र शाहू (वय १५) सायकलने जात होता. कोहिनूर लॉनजवळ त्याला भरधाव कारचालकाने (एमएच १२/जेयू ०१९६) जोरदार धडक मारली. त्यामुळे हरीश गंभीर जखमी झाला. त्याला न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना हरीशचा मृत्यू झाला. हे प्रकरण दडपण्यासाठी आरोपीकडून काही जणांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे काही वेळ रुग्णालयातही वातावरण संतप्त झाले होते. दरम्यान, नंदनवन पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)