शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशासाठी दोन नियम क से?

By admin | Updated: March 26, 2016 02:57 IST

आरटीई अंतर्गत नर्सरीमध्ये प्रवेशासाठी ३१ जुलै २०१६ पर्यंत तीन वर्ष पूर्ण व पहिल्या वर्गासाठी पाच वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे.

आरटीई नियमात : इतर प्रवेशात मनमानीनागपूर : आरटीई अंतर्गत नर्सरीमध्ये प्रवेशासाठी ३१ जुलै २०१६ पर्यंत तीन वर्ष पूर्ण व पहिल्या वर्गासाठी पाच वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे ३१ जुलैपर्यंत आरटीईने निर्धारित केलेले वर्ष पूर्ण होण्यास एक दिवससुद्धा बाकी असेल, तर विद्यार्थ्याला प्रवेशासाठी एका वर्षाची वाट बघावी लागणार आहे. परंतु तोच विद्यार्थी प्रवेशासाठी इतर कुठल्याही शाळेत गेल्यास त्याला वयाची अडचण नाही. प्रवेशासाठी दोन नियम का? असा सवाल आरटीईच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांनी केला आहे. आरटीई अ‍ॅक्शन कमिटीकडे यासंदर्भातील पालकांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शासनाने बालकांच्या प्रवेशासंदर्भात किमान वय निर्धारित केले आहे. हा नियम आरटीईचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच इतरही विद्यार्थ्यांसाठी आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पत्र सर्व विभागीय उपसंचालकांना पाठविण्यात आले आहे. नियमानुसार नर्सरीसाठी विद्यार्थ्यांचे ३१ जुलै २०१६ रोजी तीन वर्ष पूर्ण व पहिल्या वर्गासाठी पाच वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाच्या या नियमाचे तंतोतंत पालन आरटीईमध्ये होते. कारण आरटीई प्रक्रिया आॅनलाईन असल्याने, निर्धारित केलेल्या तारखेला विद्यार्थ्याचे वय पूर्ण होत नसले तर, अर्जच स्वीकारला जात नाही. आरईटी अ‍ॅक्शन कमिटीकडे आकाश वसू व ज्ञानेंद्र तिवारी या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. आकाशला नर्सरीत प्रवेश हवा आहे. त्याला ३१ जुलै २०१६ ला तीन वर्ष पूर्ण होण्यासाठी आठ दिवस शिल्लक आहे. तर ज्ञानेंद्र तिवारी या विद्यार्थ्याला पहिल्या वर्गात प्रवेश घ्यायाचा आहे. त्याला पाच वर्ष पूर्ण होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी आहे. परंतु हे विद्यार्थी इतर शाळेत प्रवेशासाठी गेले असता, त्यांना वयाचे बंधन आड आले नाही. आरटीईच्या प्रक्रियेत येण्यासाठी त्यांना आणखी एक वर्ष वाट बघावी लागणार आहे. अशा अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी पुढे येत असल्याचे आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मो. शाहिद शरीफ यांनी सांगितले. मुलांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षण विभागाने किमान दोन महिन्यांची सूट द्यावी, अशी मागणी कमिटीतर्फे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)