शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पहिल्यांदाच आढळल्या दुर्मीळ रक्तगटाच्या दोन व्यक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:08 IST

नागपूर : दुर्मीळ रक्तगट म्हणून ‘बॉम्बे’रक्तगटाकडे पाहिले जात असताना नागपुरात ‘पॅराबॉम्बे’ रक्तगट असलेल्या दोन व्यक्ती आढळून आल्या आहेत. नागपुरात ...

नागपूर : दुर्मीळ रक्तगट म्हणून ‘बॉम्बे’रक्तगटाकडे पाहिले जात असताना नागपुरात ‘पॅराबॉम्बे’ रक्तगट असलेल्या दोन व्यक्ती आढळून आल्या आहेत. नागपुरात या रक्तगटाची ही पहिलीच नोंद असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आढळून आलेल्या दोन्ही व्यक्ती ‘पॅराबॉम्बे ओ पॉझिटिव्ह’ रक्तगटाच्या असून, हा दुर्मिळातील दुर्मीळ रक्तगट आहे.

अचानकपणे जिवावर संकट येऊन रक्ताची गरज कोणाला, कधी व कुठे पडेल, हे सांगता येत नाही. यामुळे कोरोना काळात कमी झालेले रक्तदान शिबिरांनी आता पुन्हा वेग घेतला आहे. असेच एक शिबिर डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने आठ रस्ता चौक येथे आयोजित करण्यात आले होते. यात एक व्यक्ती रक्तदानासाठी आली असताना त्यांनी आपल्या मुलाचा रक्तगट दुर्मीळ असल्याचे सांगितले. रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा सोनी यांनी याची दखल घेतली. त्या वडिलांसोबत त्यांच्या मुलाचा रक्ताचा नमुना घेऊन तपासले असता ‘पॅराबॉम्बे’ रक्तगट असल्याचे आढळून आले. त्यांनी या रक्तगटावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दोघांचे रक्तनमुन्यांसह लाळीचे नमुने मुंबईतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहिमॅटोलॉजी’कडे (एनआयएच) पाठविले. त्यात ‘पॅराबॉम्बे’ रक्तगट असल्याचे निष्पन्न झाले.

-या रक्तगटाच्या व्यक्तींना दिला जातो ‘बॉम्बे’ रक्तगट

डॉ. सोनी यांनी यांनी सांगितले, रक्ताच्या निर्मितीसाठी शरीरातील ‘एच अँटिजेन’ची गरज असते. जनुकीय रचनेत काही कारणांमुळे ‘म्युटेशन’ म्हणजे बदल झाल्यास ‘एच अँटिजन’ तयार न होता त्याच्या विरोधात अँटिबॉडीज तयार होतात. यामुळे यांच्या सर्वसाधारण रक्तगट चाचण्यांमधून हा रक्तगट ‘ओ’ दिसून येतो. ‘पॅराबॉम्बे’ रक्तगटाच्या व्यक्तीमध्ये ‘एच अँटिजेन’ किंवा ‘एच अँटिबॉडीज’ न बनता थोड्याफार प्रमाणात ‘एच अँटिजेन’ व ‘अँटिबॉडीज’ राहून जातात. बॉम्बे रक्तगटातील व्यक्तीचा लाळेत अँटिबॉडीजमध्ये दिसून येत नाही. या उलट पॅराबॉम्बे रक्तगटाच्या लाळेत अँटिबॉडीज दिसून येतात. या रक्तगटाच्या व्यक्तींना रक्त देण्याची गरज पडल्यास ‘बॉम्बे’ रक्तगट दिला जातो.

-बॉम्बे रक्तगटाच्या १५ व्यक्तींमध्ये एक पॅराबॉम्बे रक्तगटाचा व्यक्ती

दुर्मीळ रक्तगटाची नोंद ही वेगळ्या डिरेक्टरीमध्ये केली जाते. त्यानुसार मुंबईमध्ये बॉम्बे रक्तगटाच्या जवळपास ६०० व्यक्ती आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या रक्तगटाच्या अधिक व्यक्ती आढळून येतात. साधारण १० हजार व्यक्तींमध्ये बॉम्बे रक्तगटाचा एक व्यक्त दिसून येतो, तर बॉम्बे रक्तगटाच्या १५ व्यक्तींमध्ये सुमारे एक व्यक्ती ही पॅराबॉम्बे रक्तगटाची आढळून येते. म्हणून हा रक्तगट दुर्मिळातील दुर्मीळ आहे. सध्यातरी नागपुरात या रक्तगटाच्या एकाही व्यक्तीची नोंद नाही, असेही डॉ. सोनी म्हणाल्या.