शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सोन्याचे दागिने देऊन दोन लाख लंपास

By admin | Updated: March 4, 2017 01:56 IST

गोल्ड लोनच्या नावाखाली दोन लाख रुपये घेऊन एका आरोपीने खासगी कंपनीच्या शाखा व्यवस्थापकाच्या हातात बनावट सोन्याचे दागिने ठेवले.

कर्ज घेण्याच्या नावाखाली फसवणूक : धंतोलीत गुन्हा दाखल नागपूर : गोल्ड लोनच्या नावाखाली दोन लाख रुपये घेऊन एका आरोपीने खासगी कंपनीच्या शाखा व्यवस्थापकाच्या हातात बनावट सोन्याचे दागिने ठेवले. ही बनवाबनवी धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आलोक पांडे (रा. रामबाग कॉलनी, इमामवाडा) असे आरोपीचे नाव आहे. राहुल विलासराव खापेकर (वय ३२, रा. प्राची अपार्टमेंट, इमामवाडा) हे इंडिया इन्फो लाईन हायमन्स लि. या कंपनीत अजनी शाखाप्रमुख म्हणून कार्यरत आहे. ही कंपनी कर्ज उपलब्ध करून देते. काही दिवसांपूर्वी खापेकर त्यांच्या कंपनीचे गोकुळपेठेत मार्केटिंग करीत असताना आरोपी पांडे त्यांना भेटला. आपण मणप्पुरम गोल्डमधून ८ लाखांचे कर्ज घेतले आहे. हे कर्ज तुमच्या कंपनीत वळते करायचे आहे, असे आरोपीने सांगितले. विश्वास बसावा म्हणून आरोपी पांडेने खापेकरांना २ लाख, ३४ हजार तसेच ९० हजार कर्ज परत केल्याच्या दोन पावत्याही दाखवल्या. त्यानंतर माझ्याकडे २ लाख ३४ हजारांचे सोन्याचे दागिने आहे. त्यावर तुमच्या कंपनीतून २ लाखांचे कर्ज हवे आहे, असे सांगून आरोपी निघून गेला. २७ फेब्रुवारीला दुपारी २ वाजताच्या सुमारास खापेकर यांनी आरोपी पांडेला फोन करून २ लाखांची व्यवस्था झाल्याचे सांगून अजनी शाखेत बोलविले. तेथे खापेकर यांनी आरोपी पांडेला २ लाख रुपये दिले. बदल्यात पांडेने खापेकरच्या हातात दागिने ठेवले.(प्रतिनिधी) फिर्यादी उभे राहिले, आरोपी निघून गेला हा व्यवहार झाल्यानंतर आधार कार्ड अन् विजेचे बिल पाहिजे, असे खापेकरने सांगितले. घरून देतो, असे सांगून पांडेने खापेकर यांना रामबागमधील एका फर्निचरच्या दुकानाजवळ नेले. तेथे त्यांना उभे ठेवून कागदपत्रे घेऊन येतो, असे म्हटले. खापेकर तब्बल दोन तास उभे राहिले. मात्र, आरोपी परत आला नाही. त्याने दिलेल्या पत्त्यावर आणि परिसरात चौकशी केली असता, आलोक पांडे नावाचा इसमच राहत नाही, असे नागरिकांनी सांगितले. हादरलेल्या खापेकरने दागिने तपासले असता ते सोन्याचे नव्हे तर दुसऱ्या पिवळ्या धातूचे (बनावट) असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खापेकर यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कथित आलोक पांडेचा शोध घेतला जात आहे.