शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉलच्या वापरामुळे दोन लाख कोटींची बचत

By admin | Updated: August 23, 2014 03:04 IST

पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत इथेनॉलचा खर्चही कमी आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विदेशी चलनात बचत होईल.

नागपूर : पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत इथेनॉलचा खर्चही कमी आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विदेशी चलनात बचत होईल. पेट्रोलजन्य पदार्थाच्या आयातीवर वर्षाला सहा लाख कोटी खर्च होतात.पेट्रोलऐवजी इथेनॉलचा वापर झाला तर दोन लाख कोटींची बचत होईल. पर्यावरण वाद्यांच्या जीवनात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. इथेनॉलमुळे पर्यावरण संवर्धनाला मदत होईल, असा विश्वास केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या देशातील पहिल्या बसचे लोकार्पण शुक्रवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. स्कॅनिआ कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅडर्स ग्रंडस्ट्रॉमर यांनी महापौर अनिल सोले यांना ग्रीन बसची चावी सोपविली तर गडकरी यांनी इथेनॉल बसला हिरवी झेंडी दिली. या वेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजय गंगोपाध्याय, अनिल सोले, उपमहापौर जैतुन्नबी अन्सारी, खासदार अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे, माजी आमदार गिरीश गांधी, भाजपचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे, आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, मनपा आयुक्त श्याम वर्धने , अ‍ॅडर्स ग्रंडस्ट्रॉमर ,एमएनआरई च्या संचालिका परविंदर धनेचा आदी उपस्थित होते.या वेळी गडकरी यांनी स्कॅनिआ कमर्शियल व्हेईकल्स इंडिया प्रा. लि. कंपनीने विदर्भात उद्योग सुरू करावा, असे आवाहन कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅडर्स ग्रंडस्ट्रॉमर यांना केले. यासाठी कंपनीला जमीन व आवश्यक परवानगी सहा महिन्यात उपलब्ध केली जाईल. यातून विदर्भातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. तसेच शेतक ऱ्यांनाही याचा लाभ होईल. त्यांच्या जीवनमानात बदल होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.शहर व ग्रामीण भागातील बस वाहतुकीसाठी इथेनॉल व बायोगॅसचा अधिकाधिक वापर करण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असल्याची माहिती संजय गंगोपाध्याय यांनी दिली.इथेनॉल बस चालविणारी घटना ऐतिहासिक असून हा बहुमान नागपूर महापालिकेला मिळाला. यातून देशात इथेनॉलची क्रांती होईल, असा विश्वास महापौर अनिल सोले यांनी व्यक्त केला.नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे भूषण आहे. प्रगती बघून दृष्ट लाण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा गिरीश गांधी यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)