शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन कैद्यांना आपत्कालीन पॅरोल नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 10:28 IST

Nagpur News मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील कैदी असगर कादर शेख व मो. याकुब अब्दुल माजीद नागुल यांनी आपत्कालीन पॅरोल मिळण्यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली.

ठळक मुद्देपॅरोलसाठी पात्र नसल्याचे स्पष्ट केलेउच्च न्यायालयाचा दणका

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील कैदी असगर कादर शेख व मो. याकुब अब्दुल माजीद नागुल यांनी कोरोना संक्रमणामुळे आपत्कालीन पॅरोल मिळण्यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. या कैद्यांनी गंभीर गुन्हे केले आहेत. तसेच, त्यांनी यापूर्वी पॅरोल दिल्यानंतर वेळेत आत्मसमर्पण केले नाही. त्यामुळे ते आपत्कालीन पॅरोलसाठी पात्र नाहीत, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

या दोन्ही कैद्यांना १९९६ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात विविध कलमांतर्गत एकूण ५५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना प्रत्येक कलमाखालील कारावास एकापाठोपाठ एक भोगायचा आहे. आतापर्यंत असगर कादर शेखने २३ तर, मो. याकुबने १८ वर्षे कारावास भोगला आहे. दोन्ही कैदी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. कोरोना संक्रमणामुळे सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व सुधारित पॅरोल नियमानुसार ४५ दिवसांचा आपत्कालीन पॅरोल मिळवण्यासाठी त्यांनी सुरुवातीला कारागृह अधीक्षकांकडे अर्ज सादर केला होता. ८ मे २०२० रोजी जारी राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार तो अर्ज ३० जून २०२० रोजी नामंजूर करण्यात आला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना येथेही दणका बसला.

सत्य सांगणे वकिलाचे कर्तव्य

यापूर्वी पॅरोल दिला असता विलंबाने आत्मसमर्पण केल्यामुळे सदर कैदी आपत्कालीन पॅरोलसाठी पात्र नाहीत, हे माहिती असताना कैद्यांच्या वकिलाने ही बाब निदर्शनास आणून दिली नाही म्हणून न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. मनासारखा आदेश मिळवण्यासाठी अशी कृती करणे योग्य नाही. सत्य माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे वकिलाचे कर्तव्य आहे अशी समज न्यायालयाने दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय