शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
3
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
4
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
5
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
6
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
7
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
8
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
9
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
10
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
11
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
12
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
13
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
14
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
15
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
16
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
17
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
18
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
19
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
20
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा

विमानतळावर व्हीआयपी पार्किंग व्यवस्था बंद करा

By admin | Updated: May 4, 2017 02:24 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीआयपी पार्किंग पूर्णपणे बंद करण्याची मागणी करणारे

व्हीटीएची मागणी : मुळेकर यांचे आश्वासन नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीआयपी पार्किंग पूर्णपणे बंद करण्याची मागणी करणारे निवेदन विदर्भ टॅक्सपेयर असोसिएशनने (व्हीटीए) मिहान इंडिया लिमिटेडचे (एनआयएल) वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांना दिले. विमानतळावर असुविधाजनक पार्किंग व्यवस्थेसंदर्भात पाठपुरावा करताना व्हीटीएने यापूर्वी निवेदन दिले होते. ही बाब गांभीर्याने घेत एमआयएलने विमानतळावर १५ एप्रिलपासून प्रवाशांसाठी नवीन पार्किंग व्यवस्था लागू केली आहे. व्यवस्थेची व्हीटीएने प्रशंसा केली आणि त्यात आणखी सुधारणा करण्याची मागणी केली. व्हीटीएचे अध्यक्ष शर्मा म्हणाले, काही दिवसात विमानतळाच्या पार्किंगमध्ये सुधारणा झाली असून त्यात आणखी सुधारणांची गरज आहे. नागपुरातून चेन्नई व जयपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे लवकरच विमानसेवा सुरू करावी. व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी सांगितले की, नवीन पार्किंग प्रणालीनुसार आपातकालीन लेन विमानतळाच्या इमारतीजवळ आहे. ही सुविधा उत्तम आहे. पण अनेकदा व्हीआयपी या लेनचा उपयोग करताना दिसतात. आता नवीन प्रणाली पर्याप्त लेनसह उपलब्ध आहे. त्या ठिकाणी व्हीआयपी कार अतिथींची वाट पाहू शकतात. यामुळे आपातकालीन क्षेत्रात प्रत्येक प्रवाशांवर सक्तीने प्रतिबंध लावले पाहिजे. या क्षेत्राचा उपयोग केवळ सुरक्षा, अ‍ॅम्ब्युलन्स, अग्निशमन आदींसाठी व्हावा. रेणू म्हणाले, जनरल पिकअप आणि ड्रॉप क्षेत्र सर्वाधिक विवादित आहे. कारण त्याची वेळ केवळ पाच मिनिटे आहे. अनेकदा प्रवाशांना बाहेर निघताना गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे जनरल पार्किंग क्षेत्रातून व्हीआयपी लेन बंद करावी. मुळेकर यांनी व्हीटीएच्या सूचनांची प्रशंसा केली आणि पिकअप व ड्रॉप क्षेत्रातून बाहेर निघताना एकीकडे बॅरिकेट्स लावण्यात येईल आणि जनरल पार्किंगमधून व्हीआयपी लेन बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिले. चर्चेदरम्याान व्हीटीएचे कार्यकारिणी सदस्य अमरजीत सिंह चावला व साकिब पारेख, एमआयएलचे महाव्यवस्थापक आबीद रुही, वरिष्ठ व्यवस्थापक (एपी अ‍ॅण्ड सी) सूरज शिंदे आणि सुरक्षा व्यवस्थापक यशवंत सातरकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)