शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

टीटीएलमुळे १४ व्या मजल्यापर्यंत आगीवर नियंत्रण शक्य

By admin | Updated: June 23, 2017 02:28 IST

नागपूर शहराचा चौफेर विकास होत आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. याचा विचार करता महापालिकेचा

विभागाची क्षमता वाढली े स्वयंचलित असल्याने सहज वापर े अग्निशमन विभागाची वाढली शान लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराचा चौफेर विकास होत आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. याचा विचार करता महापालिकेचा अग्निशमन विभागाला अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातूनच गेल्या सहा महिन्यांपूर्वी अग्निशमन विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक टर्न टेबल लॅन्डर (टीटीएल) दाखल झाले आहे. आता ४२ मीटर उंचीपर्यंतच्या इमारतीतील आग नियंत्रणात आणणे सहज शक्य झाल्याने टीटीएलने विभागाची शान वाढली आहे. युरोपीयन निकष पूर्ण करीत असलेली अग्निशमन विभागाची वाहने सर्वोत्तम मानली जातात. असे सर्व निकष पूर्ण करीत असल्याने आॅस्ट्रियाच्या रोजर बावर कंपनीकडून टीटीएल खरेदी करण्यात आली आहे. महापालिकेला यावर आठ कोटी रुपये खर्च करावे लागले. टीटीएलचा वापर करण्यासाठी अग्निशमन विभागातील जवानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. टीटीएलचा पुरवठा केल्यापासून तीन वर्षांपर्यंत या मशीनची देखभाल रोजर बावर कंपनीकडे राहणार आहे. तीन वर्षे या मशीनचा वॉरंटी कालावधी आहे. त्याशिवाय विभागाने आणखी पाच वर्षे एक व्यापक देखभाल करार केला आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे महापालिकेला आठ वर्षांसाठी मोफत देखभाल मिळणार आहे. स्नोर्कल खरेदीचाही प्रस्ताव टीटीएल खरेदी करण्याचा प्रस्ताव २००९ साली तयार करण्यात आला होता. विभागाकडे १५ मीटर क्षमतेच्या स्नोर्कल उपलब्ध आहेत. परंतु शहरातील उंच इमारतीची संख्या विचारात घेता विभागाने ३२ मीटर क्षमतेच्या स्नोर्कल खरेदीचाही प्रस्ताव सादर केला आहे. टीटीएल सर्व दिशांना फिरतेटीटीएलमध्ये स्वयंचलित यंत्रणा आहे. ती एकाच जागेवरून सर्व दिशांना फिरते. त्यामुळे आग आटोक्यात आणताना अडचण येत नाही. एका जागेवर टीटीएल उभी केल्यानंतर सभोवतालच्या उंच इमारतीतील आग आटोक्यात आणणे शक्य झाले आहे. सात ते आठ जवानांना काम करणे शक्य उंच इमारतीत आग लागल्यास ती आटोक्यात आणताना मनुष्यबळाची गरज असते. टीटीएलमध्ये एकाचवेळी सात ते आठ जवानांना काम करता येईल, अशी सुविधा आहे. त्यामुळे आग कमी वेळात आटोक्यात आणणे शक्य होते.५६ मीटर क्षमतेच्या गाडीची गरजनागपूर शहराचा चौफेर विकास होत असल्याने ५० ते ६० मीटरपर्यंत उंचीच्या टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. याचा विचार करता अग्निशमन विभागाला ५६ मीटर उंचीवरील आग आटोक्यात आणण्याची क्षमता असलेल्या अत्याधुनिक गाडीची गरज आहे. हा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे.पाण्याला २०० किलो वजनाचा दाबआग आटोक्यात आणताना पाण्याचा वापर करावा लागतो. टीटीएलमध्ये २०० किलो वजनाच्या दाबाने पाण्याचा मारा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे आग लवकर आटोक्यात आणता येते.उंचीवर काम करण्याची क्षमताटीटीएलची ४२ मीटरपर्यंतच्या उंचीवरील आग आटोक्यात आणण्याची क्षमता आहे. सोबतच उंचीवरील आग आटोक्यात आणताना जवानांना व्यवस्थित काम करता येते. त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागत नाही.१२.५ मीटर लांबी टीटीएलची क्षमता ४२ मीटरची असली तरी या गाडीची लांबी १२.५ मीटर तर उंची ३.५ मीटर आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर चालविता कोणताही अडथळा येत नाही.