शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

हवालदाराला मदत करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न

By admin | Updated: December 13, 2015 03:06 IST

अंबाझरी पोलीस ठाण्यातील मालखान्यातून रोख रकमेसह ३७ लाख रुपयाचा माल लंपास केल्याप्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्यातील मालखान्यातून रोख रकमेसह ३७ लाख रुपयाचा माल लंपास केल्याप्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच आरोपी दिलीप चोरपगार खरी माहिती दडवत आहे. अंबाझरी पोलिसांनी ८ डिसेंबरला रात्री त्याला अटक केली. दिलीप अंबाझरी ठाण्यात तैनात होता. त्याच्याकडे मालखान्याचा प्रभार होता. त्या दरम्यान त्याने ११ लाख २ हजार ३०० रुपये आणि दीड किलो सोने गायब केले. तीन वर्षांपूर्वी त्याची मुख्यालयात बदली झाली. त्यानंतरही त्याने आपला कार्यभार सोपविला नव्हता. या घटनेकडे अधिकाऱ्यांनी सुद्धा दुर्लक्ष केले. दिलीपने मालखान्यातील माल लंपास केल्याबाबत अनेक दिवसांपासून ठाण्यात चर्चा होती. त्याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. चार महिन्यापूर्वी दिलीपला अंबाझरी ठाण्याशी जोडण्यात आले होते. तीन चार दिवसांपूर्वी तो गायब झाला. त्याने ड्युटीवर येणेही बंद केले. तो घरूनही गायब होता. फोनवरही तो प्रतिसाद देत नव्हता. ८ डिसेंबर रोजी रात्री तो पोलिसांच्या हाती लागला. तेव्हा अपहाराचे प्रकरण उघडकीस आले. सूत्रानुसार दिलीपला मटक्याचा शौक आहे. त्याने दागिने विकले असून काही गहाणही ठेवले आहेत. त्यामुळे त्याला इतर लोकांनीही मदत केल्याचे लक्षात येते. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास दिलीपला मदत करणाऱ्या आणि त्याला वाचवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. (प्रतिनिधी)त्यामुळेच अंबाझरी पोलीस हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. दिलीपला १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.