शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा

By admin | Updated: August 11, 2014 00:54 IST

समस्या प्रत्येकच क्षेत्रात येतात पण त्यातून मार्ग काढावा लागतो. कलावंतांनाही अनेक समस्या आहेत पण त्यावर सर्वांनीच एकत्रित येऊन उपाय शोधण्याची गरज आहे. कलावंतांच्या समस्या,

विदर्भ गौरव प्रतिष्ठान : कलावंत मेळावा नागपूर : समस्या प्रत्येकच क्षेत्रात येतात पण त्यातून मार्ग काढावा लागतो. कलावंतांनाही अनेक समस्या आहेत पण त्यावर सर्वांनीच एकत्रित येऊन उपाय शोधण्याची गरज आहे. कलावंतांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी सर्व वैदर्भीय कलावंतांनी एकत्रित आले पाहिजे आणि संघटनेची बांधणी केली पाहिजे. पण विदर्भात सर्व कलावंत एकत्रित आल्याचे चित्र दुर्दैवाने दिसत नाही. एकमेकांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करताना परस्परांविषयी असूया निर्माण होत असेल तर विदर्भात कला क्षेत्राचा विकास होणार नाही. कलाक्षेत्रातल्या समस्या सोडविण्यासाठी कलावंतांनी प्रथम एकत्र आले पाहिजे, असे आवाहनवजा बोल डॉ. गिरीश गांधी यांनी कलावंतांना ऐकविले. विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्यावतीने आज साई सभागृह, शंकरनगर येथे गायक, वादक, निवेदक यांचा कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खा. दत्ता मेघे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय पाटील, सुप्रसिद्ध गायक एम. ए. कादर, संगीत संयोजक सचिन ढोमणे प्रामुख्याने उपस्थित होते. गिरीश गांधी म्हणाले, काही वेळेला व्यासपीठावर रफींची गीते सादर केल्यावर लोक स्वत:ला मो. रफी किंवा किशोरकुमारच समजतात. स्वत:ला मो. रफी आणि किशोरकुमार समजू नका. त्यांच्यासारखी साधना करण्याचे आणि गुणात्मकता मिळविण्यासाठी धडपड करण्याचेही लक्ष्य बाळगा. कलावंतांनी नेहमीच समाजासाठी काम करायला हवे. समाजासाठी कलावंतांनी काम केले तर समाजाचाही त्यांना पाठिंबा मिळेल. कलावंतांचा समाजाला त्रास होता कामा नये. विदर्भात गायकांची मोठी परंपरा आहे.ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी वैदर्भीय कलावंतांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याप्रमाणेच कलावंतांनी स्वत:च्या उणिवा शोधल्या पाहिजेत. प्रत्येकानेच स्वत:ला ए ग्रेड समजू नये. प्रत्येकाच्या दर्जाप्रमाणे त्यांना मानधन मिळाले पाहिजे. त्यासाठी कलावंतांनी स्वत:ची श्रेणी तपासली पाहिजे. अनेक गायक स्वत:च्या गायनात वर्षानुवर्षे बदल करू शकत नाही. दर्जा वाढविण्यावर त्यांनी भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. कादरभाई म्हणाले, इंडियन परफार्मिंग राईट्स कमिटीच्या नियमाप्रमाणे रेकॉर्डिंगच्या वेळी शासनाला मोठ्या प्रमाणात निधी द्यावा लागतो.त्यामुळे कलावंतांची रॉयल्टी खूपच कमी होते. त्यामुळे सादरीकरण करणाऱ्या कलावंतांना रॉयल्टीपोटी अत्यल्प रक्कम मिळते. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर कार्यक्रम सादर करता येत नाही. त्यासाठी कलावंतांनाच प्रायोजक शोधून आणण्याचे आवाहन केले जाते. सचिन ढोमणे म्हणाले, कलावंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि समाजाला काहीतरी चांगले देण्यासाठी कटिबद्ध आहेत. पण या कामात आर्थिक चणचण भासते. त्यात नागपुरातील सभागृहाचा किराया कलावंतांना झेपत नाही. शहरातील सभागृहांचे भाडे कमी करण्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मुंबई - पुण्याच्या कलावंतांना तेथे ग्लॅमर मिळते. ते ग्लॅमर येथल्या कलावंतांना लाभत नसल्याने त्यांची प्रगती होत नाही. यासाठी एखादी संस्था स्थापन करून सर्व कलावंतांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार मो. असीम यांनी मानले. (प्रतिनिधी)