शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या २४२ ‘लोको’वर झळकणार तिरंगा

By admin | Updated: August 14, 2016 02:48 IST

स्वातंत्र्य दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी रेल्वे बोर्डाने सर्व झोनमधील विभागांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या

रेल्वे बोर्डाचे निर्देश : नागपूर विभागात अंमलबजावणी सुरू नागपूर : स्वातंत्र्य दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी रेल्वे बोर्डाने सर्व झोनमधील विभागांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ‘लोको’ (रेल्वे इंजिन) वर तिरंगा झेंडा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान मध्य रेल्वेचा नागपूर विभाग आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील एकूण २४२ ‘लोको’वर तिरंगा झेंडा काढण्यात येणार आहे. भारतात रेल्वे हे प्रवासाचे सुलभ, स्वस्त माध्यम असल्यामुळे देशात लाखो नागरिक रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात. स्वातंत्र्य दिन दोन दिवसांवर आलेला असताना त्यानिमित्त रेल्वे बोर्डाने आदेश काढून रेल्वेच्या सर्व झोनमध्ये येणाऱ्या विभागांना रेल्वेच्या इंजिनावर भारताचा तिरंगी ध्वज काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. रेल्वे इंजिनच्या समोरील दर्शनी भागात हा तिरंगा झेंडा राहणार असून यामुळे प्रवाशांमध्ये देशप्रेमाची भावना जोपासण्याचा संदेश देण्याचा रेल्वेचा मानस आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये एकूण २१७ इलेक्ट्रिक लोको आहेत. या लोकोवर तिरंगा काढण्यास सुरुवात झाली असून रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतर यातील १५ लोकोवर तिरंगा काढण्यात आला आहे. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ११ नॅरोगेज डिझेल लोको आणि १४ ब्रॉडगेज डिझेल लोको आहेत. या लोकोवरही तिरंगा झेंडा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे लवकरच नागपूर विभागातून ये-जा करणाऱ्या सर्व रेल्वेच्या इंजिनवर भविष्यात तिरंगा झळकताना प्रवाशांना पाहावयास मिळणार आहे. (प्रतिनिधी)