शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगांरासाठी महिलांना ‘जनसंग्राम’तर्फे प्रशिक्षण

By admin | Updated: August 13, 2014 00:46 IST

जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. परिणय फुके यांच्यातर्फे शहरातील विविध भागातील महिला बचत गटांना नि:शुल्क स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिला

परिणय फुके यांचा पुढाकार : बचत गट लागले कामालानागपूर : जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. परिणय फुके यांच्यातर्फे शहरातील विविध भागातील महिला बचत गटांना नि:शुल्क स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिला आत्मनिर्भर होतील व घरबसल्या लघुउद्योग सुरू करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील, असा विश्वास डॉ. फुके यांनी यावेळी व्यक्त केला. तेलंगखेडी, रामनगर, दाभा, वाडी टेकडी, मानकापूर या परिसरातील महिला बचत गटांना कागदी पिशवी, लिफाफे, फाईल्स, कागदी फुल इत्यादी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अंबाझरी टेकडी, झिंगाबाई टाकळी, पांढराबोडी या परिसरातील महिला बचत गटांना मेणबत्ती बनविणे व मेणा(व्हॅक्स)पासून बाहुल्या, झाड, फुले, दिवाळी मेणबत्ती, ख्रिसमस मेण ट्री तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व प्रत्यक्षात वस्तू तयार केल्या. आजवर सुमारे १०० महिला बचत गटांच्या एक हजार महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. महिला बचत गटांनी तयार केलेले उत्पादन किंवा मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जनसंग्राम फाऊंडेशन व ग्राम मार्ट इंडिया लि़ मुंबई यांनी स्वीकारली. महिला फक्त माल तयार करतील. तो विकण्याची जबाबदारी आमची राहील, असेही डॉ. फुके यांनी प्रशिक्षणादरम्यान सांगितले. ज्या महिलांना किंवा महिला बचत गटांना या वस्तू बघून त्याद्वारे प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांनी जनसंग्राम फाऊंडेशन, अंबाझरी, हिलटॉप, येथे संपर्क साधावा़, असे आवाहनही डॉ. फुके यांनी केले. या महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्याचे काम प्रशिक्षक संगीता जेठे, मिटकॉनचे प्रबंघक ज्ञानेश्वर चौधरी, जयदीप दास हे करीत आहेत. प्रशिक्षणात कला, कौशल्य, संवाद, बाजारपेठ, बाजारमूल्य, संभाषण कौशल्य आदींची माहिती दिली जाते. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना एका छोटेखानी समारंभात डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले़. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन डोये, आशिष मनकवडे, मंगेश तागडे, शेखर मनकवडे आदींनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)