शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याला लुटणारा अडकला

By admin | Updated: July 13, 2016 03:29 IST

चाकूचे घाव घालून धान्य व्यापाऱ्याला लुटणारा कुख्यात गुंड फैजान खान (रा. संत्रा मार्केट) याला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली.

साथीदार फरार : व्यापाऱ्यात असंतोष नागपूर : चाकूचे घाव घालून धान्य व्यापाऱ्याला लुटणारा कुख्यात गुंड फैजान खान (रा. संत्रा मार्केट) याला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. त्याचे साथीदार मात्र फरार आहेत. रविवारी रात्री दोसर भवन चौकाजवळ ही घटना घडली होती. धान्य व्यापारी रत्नेश जितेंद्र गुप्ता आणि त्यांचा भाऊ रूपेश हे दोघे रविवारी रात्री १० च्या सुमारास मोटरसायकलने अग्रसेन चौकातून दोसर भवन चौकाकडे जात होते. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र योगेश पुरोहितही होते. आर्य समाज भवनजवळ आरोपी फैजान आपल्या साथीदारांसह उभा होता. त्याने रत्नेशला थांबवून जबरदस्तीने रक्कम हिसकण्याचा प्रयत्न केला. गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली. विरोध केला असता फैजान आणि त्याच्या साथीदारांनी रत्नेशवर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. रत्नेशच्या मदतीला धावलेल्या योगेश याच्यावरही आरोपींनी चाकूहल्ला केला. या घटनेमुळे व्यापारीवर्गात तीव्र असंतोष पसरला होता. मोठ्या संख्येत व्यापाऱ्यांनी मेयो तसेच पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींच्या गुंडगिरीचा निषेध नोंदवत व्यापाऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे मध्यरात्री १२.३० पर्यंत मोठा तणाव होता. पोलिसांनी धावपळ करून आरोपी फैजानला पहाटे अटक केली. त्याला कोर्टात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)