शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडी

By admin | Updated: March 16, 2017 02:18 IST

शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मेयो हॉस्पिटल चौक : नागरिक त्रस्त, रस्त्यावर अंधार नागपूर : शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच मेयो चौकातील मेट्रोच्या बांधकामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सकाळी या मार्गावरून कार्यालयात जाणाऱ्यांनी वाहतुकीच्या कोंडीमुळे मार्ग बदलला आहे. त्यातच सायंकाळी परत येणाऱ्यांना अंधारातच मार्ग काढावा लागत आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस जास्त संख्येने तैनात करण्याची मागणी या परिसरातील दुकानदार आणि नागरिकांनी लोकमतशी बोलताना केली. रामझुला-२ आणि मेट्रोचे बांधकाम वेगात सुरू आहे. पण वाहतूक कोंडी सोडविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे अनेक जण दुसऱ्या मार्गाने कार्यालयात पोहोचत आहेत. रामझुला-२ च्या बांधकामामुळे रामझुला-१ वरून सर्वच गाड्यांची ये-जा सुरू आहे. या पुलावरून चढताना प्रारंभीच अनेक वाहने वळसा घालून परत जातात. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडून येणाऱ्या वाहनांची कोंडी होते. यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहने याच ठिकाणी थांबतात. या परिसरातील नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस उपायुक्तांकडे निवेदने दिली आहेत. पण पोलीस वाहतूक कोंडीकडे लक्ष न देताना चालान फाडण्यात गर्क दिसतात. ही नेहमीची बाब आहे. मेट्रो रेल्वेचे सुरक्षा रक्षक वाहनांना दिशा देण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना न जुमानता चालक वाहने पुढे नेतात. ही बाब वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत आहे. तसेच मेयो चौकातून संत्रा मार्केट मार्गाने रेल्वे स्थानकाला जाताना वाहनचालकाला विशेष प्रयत्न करावे लागतात. या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे सर्व ठिकाणी बॅरिकेडस् लावले आहेत. वाहनचालकाला त्यातून मार्ग काढणे जोखिमेचे ठरत आहे. दूरपर्यंत असलेल्या बॅरिकेडस्ला वळसा घालून प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचावे लागते. ही स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याशिवाय संत्रा मार्केटकडून गांधीसागरकडे जाणाऱ्या मार्गावर एम्प्रेस मॉलसमोर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काम संथगतीने सुरू असल्यामुळे वाहतूक सुरू होण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागणार आहे. याशिवाय सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर रामझुला-१ वरून मुख्य रेल्वेस्थानक चौकात उतरल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभी असलेली चारचाकी वाहने आणि आॅटोमुळे वाहतुकीची दरदिवशी कोंडी होते. या चौकात वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहतूक पोलीस चालान फाडण्यात गर्क असल्याचे दिसून येतात. येथील वाहने हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून देण्याची या परिसरातील लोकांची मागणी आहे.(प्रतिनिधी)