शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसाची सीएला बेदम मारहाण

By admin | Updated: March 27, 2016 02:42 IST

हेल्मेट घातले नसल्याचे कारण पुढे करीत सनदी लेखापाल (सीए) असलेल्या तरुणाशी वाद घालून त्याची वाहतूक शाखेच्या पोलिसाने बेदम मारहाण केली.

क्षुल्लक कारणावरून वाद : अटकही केलीनागपूर : हेल्मेट घातले नसल्याचे कारण पुढे करीत सनदी लेखापाल (सीए) असलेल्या तरुणाशी वाद घालून त्याची वाहतूक शाखेच्या पोलिसाने बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याला शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली अटकही केली. पंकज घनश्याम ठाकूर (वय २९) असे पोलिसांनी आरोपी बनविलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास पंकज त्याच्या काकांना घेऊन दुचाकीने जरीपटक्यातून जात होता. जरीपटका पोलीस ठाण्यासमोरच्या चौकातील सिग्नलवर तो थांबला असता त्याला वाहतूक शाखेच्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने हेल्मेट का घातले नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर बाजूला उभे असलेल्या दोन पोलीस आणि एका अधिकाऱ्याकडे त्याला पाठविले. दुचाकीची चावी काढून कागदपत्रे मागितल्यामुळे पंकजने ती कागदपत्रे पोलिसांना दिली.पोलीस ठाण्यात राज्य कुणाचे ?नागपूर : पोलीस शिपाई अमरदीप गोवर्धन सोळंके (वय ३४) यांनी पंकजला अरेरावीने विचारपूस केली. त्यामुळे पंकजने आपण सीए आहोत, आपल्यासोबत सभ्य भाषेत बोला, असे म्हटले. परिणामी सोळंके दुखावला. त्याने पंकजसोबत वाद घातला आणि त्याच्या कानशिलात लगावली. पंकजसोबत झोंबाझोंबी झाल्यामुळे सोळंके खाली पडला. त्यामुळे त्याला जास्तच चेव आला. त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाजूलाच असलेल्या जरीपटका पोलीस ठाण्याचा ताफा बोलवून घेतला. त्यानंतर पंकजला त्यांनी जरीपटका ठाण्यात नेऊन त्याची बेदम धुलाई केली. त्याच्यावर अश्लील शिवीगाळ करून सोळंकेला मारहाण केल्याचा आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले. त्यानंतर जामिनावर तो बाहेर आला. (प्रतिनिधी)सीसीटीव्ही साक्षीदार आपला काही दोष नसताना पोलिसांनी आपल्याला एखाद्या गुन्हेगारासारखे बदडले. पोलिसांच्या हा गुंडगिरीचा प्रकार ठाण्यातील सीसीटीव्हीत कैद झाला असून, वरिष्ठांनी तो तपासावा आणि दोषी पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पंकजने एका निवेदनातून केली आहे.