शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीच्या इच्छेतून निर्माण झाली परंपरा

By admin | Updated: September 3, 2014 01:15 IST

महाविद्यालयीन जीवनात एकमेकांशी ओळख झाली आणि मैत्रीचे संबंध निर्माण झाले. आपली मैत्री कायम राहावी म्हणून काही मित्रांनी गणेशोत्सवाला प्रारंभ केला. आज याच गणेशोत्सवाला पाहता पाहता

अष्टविनायक दर्शन : श्री अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक मुन्ना जयस्वाल यांच्याशी संवादनागपूर : महाविद्यालयीन जीवनात एकमेकांशी ओळख झाली आणि मैत्रीचे संबंध निर्माण झाले. आपली मैत्री कायम राहावी म्हणून काही मित्रांनी गणेशोत्सवाला प्रारंभ केला. आज याच गणेशोत्सवाला पाहता पाहता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. धंतोलीच्या प्रसिद्ध अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थेचा सध्या रौप्यमहोत्सव सुरू आहे. यानिमित्ताने संस्थेने भाविकांसाठी अष्टविनायक दर्शनाची सोय केली आहे. मुन्ना जयस्वाल, सागर मेघे, राजेंद्र मुळक आणि किरण पांडव या संस्थेचे संस्थापक आहेत. मुन्ना जयस्वाल म्हणाले, शिक्षण पूर्ण झाल्यावर मित्रांचे मार्ग वेगवेगळे होतात. पण आम्ही मित्रांनी मैत्री जपण्यासाठी गणेशोत्सवाला प्रारंभ केला. १९९० साली अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर धंतोली येथे रस्त्यावर गणेश स्थापना केली. पण यामुळे वाहतुकीला त्रास होताना पाहून दुसऱ्या वर्षी महादेवराव तिवारी यांनी गणेशोत्सवाला त्यांची जागा दिली. तेव्हापासून या जागेवरच सागर मेघे यांच्या हस्ते बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात येते. जयस्वाल म्हणाले, गेल्या २५ वर्षांपासून बाबूलाल सूर्यवंशी यांनी तयार केलेली श्रींची प्रतिमा स्थापन करण्यात येते. त्याचे स्वरूप आणि उंची दरवर्षी समान ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. केवळ प्रतिमेचा रंग वेगळा असतो. श्रींचा शृंगार मात्र संस्थेचे पदाधिकारी स्वत:च्या हाताने करतात. युवापिढीला या धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून आकर्षित करून आपल्या संस्कारांचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आतापर्यंत नागपूरचा इतिहास, गणेशाच्या जन्मापासून विवाहापर्यंतची कथा, वाघ वाचवा, सुपर हिरो आदी संकल्पनेवर सजावट करण्यात आली आहे. यात अनेक ज्ञानवर्धक दृश्येही आतापर्यंत साकारण्यात आली आहेत. एक वर्षाच्या परिश्रमानंतर समुद्राचे दृश्य साकारून त्यात रेतीचे ३५ फूट उंच शिवलिंग निर्माण केले. त्यावेळी भाविकांना हे कसे तयार केले असावे, याचे खूप आश्चर्य वाटायचे. त्यावेळी आमच्या संकल्पनेने आम्हीच मोहरून जायचो. (प्रतिनिधी)एक अनुभूती अशीहीचार वर्षापूर्वी आम्हाला असा भास झाला की, मूर्तिकाराने श्रींच्या सोंडेत काही बदल केला आहे. त्यावेळी जयस्वाल आपल्या पत्नीसह मूर्तिकाराकडे गेले. तोपर्यंत त्यांनी मूर्ती पाहिलेली नव्हती. पण प्रत्यक्ष मूर्ती पाहिल्यावर मात्र श्रीं.च्या सोंडेत खरेच मूर्तिकाराने बदल केलेला होता. ते पाहून जयस्वाल यांची पत्नी आश्चर्यचकित झाली. आकर्षक स्वागतद्वार जयस्वाल म्हणाले, दरवर्षी संस्थेतर्फे पश्चिम दिशेला नवनव्या संकल्पनेवर आकर्षक विद्युतद्वार तयार करण्यात येते. आतापर्यंत अनेक ऐतिहासिक बाबींना विद्युत संकल्पनेवर साकारण्यात आले आहे. अशा धार्मिक कार्यक्रमांना शासनाने मदत करावी, असे आवाहनही जयस्वाल यांनी केले.