शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

१५० विद्यार्थ्यांना विषबाधा

By admin | Updated: January 23, 2017 01:44 IST

स्थानिक माऊंट कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.

काटोल : स्थानिक माऊंट कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी डोनट, पेस्ट्री, चोकोबार आदी खाद्यपदार्थ खाल्ले. यातून १५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून, बहुतांश विद्यार्थी ४ ते १० वर्षे वयोगटातील आहेत. सर्व विद्यार्थ्यांवर काटोल येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती डॉ. अमोल करांगळे व डॉ. राकेश वानखेडे यांनी दिली. माऊंट कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये आयोजित फूड फेस्टिव्हलसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क घेण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी डोनट, पेस्ट्री, चोकोबार यासह अन्य खाद्य पदार्थांवर मनसोक्त ताव मारला. त्यानंतर शनिवारी यातील काही विद्यार्थ्यांना ताप व डिहायड्रेशनचा त्रास सुरू झाला. त्यामुळे पालकांनी या विद्यार्थ्यांना स्थानिक बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल करांगळे व डॉ. राकेश वानखेडे यांचेकडे उपचारासाठी नेले. या विद्यार्थ्यांना खाद्य पदार्थातून विषबाधा झाल्याचे निदर्शनास येताच त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. या संदर्भात डॉ. अमोल करांगळे व डॉ. राकेश वानखेडे यांनी संयुक्तरीत्या सांगितले की, शनिवारपासून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांच्याकडे १५० विद्यार्थी उपचारासाठी आले. या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच त्रास दिसून आला. हा प्रकार अन्नातून विषबाधा झाल्यामुळेच होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. सर्व खाद्यपदार्थ काटोल शहरातील बिकानेर मिष्ठान्न भंडार येथून आणले असल्याने त्याचे मालक अशोक राजपुरोहित यांनाही विचारणा केली. त्यांनी सांगितले, माऊंट कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये खाद्यपदार्थ पुरविण्याचा आॅर्डर मिळाला होता. डोनट व पेस्ट्री गुरुवारी सकाळी ६ वाजता तयार करून ती पुरविण्यात आली होती.