शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी दाम्पत्याने घेतले विषारी द्रव्य

By admin | Updated: October 22, 2016 02:52 IST

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी दाम्पत्याने विषारी द्रव्य घेतल्याचा प्रकार कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी घडला.

पतीचा मृत्यू : पत्नीची प्रकृती धोक्याबाहेरकोंढाळी : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी दाम्पत्याने विषारी द्रव्य घेतल्याचा प्रकार कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी घडला. यामध्ये पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेमुळे मूर्ती येथे हळहळ व्यक्त होत आहे. जगन रामचंद्र खवसे (४०) आणि रेखा जगन खवसे (३५) असे या शेतकरी दाम्पत्याचे नाव असून जगन यांचा उपचारादरम्यान मेडिकलमध्ये मृत्यू झाला. दिव्यांग असलेल्या जगन यांच्या कुटुंबाच्या नावे मूर्ती - चंदनपार्डी मार्गावर सहा एकर शेती आहे. यामध्ये जगन यांच्यासह दोन भाऊ मोरेश्वर आणि रामेश्वर तसेच आईचा हिस्सा आहे. या तिन्ही भावांची अंतर्गत हिस्सेवाटणी झालेली असून तिघेही स्वतंत्रपणे शेती करीत. मात्र तीन वर्षांपासून समाधानकारक उत्पन्न न झाल्याने जगन हे गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. निसर्गाचे दुष्टचक्र, वन्यप्राण्यांचा त्रास यामुळे यावर्षीही समाधानकारक उत्पन्न होण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्यातच बँकेचे कर्ज आणि गावातील काही लोकांकडून घेतलेले हातउसणे यामुळे जगन हे सतत विचारचक्रात होते. बँकेचे कर्ज आणि हातउसणे यावर्षीही फेडता येणार नसल्याने निराश झालेल्या जगन यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पत्नी रेखासह राहत्या घरी विषारी द्रव्य घेतले. त्यावेळी नवव्या वर्गात असलेली मुलगी साधना आणि सहावीत असलेला दीपक ही दोन्ही मुले घरी नव्हते. विषारी द्रव्य घेतल्याची बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर दोघांनाही लगेच काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूरला मेडिकलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लगेच मेडिकलमध्ये हलविले. तेथे दोघांवरही उपचार सुरू असताना सायंकाळी ६.५० वाजताच्या सुमारास जगनचा मृत्यू झाला. पत्नी रेखा हिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू आहे. (वार्ताहर)