शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पाचगाव ठरले देशात अव्वल

By admin | Updated: June 11, 2017 02:11 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेले पाचगाव (ता. उमरेड) हे गाव देशातील २५ दत्तक गावांमध्ये अव्वल ठरले आहे.

खासदार आदर्श गाव योजना : पहिल्या ‘वायफाय’ गावाचा दर्जा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेले पाचगाव (ता. उमरेड) हे गाव देशातील २५ दत्तक गावांमध्ये अव्वल ठरले आहे. या गावात राबविलेल्या अनेक योजना, त्या योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी, तेथील विकास आदी बाबींमुळे पाचगावला मान मिळाला आहे. पहिल्या टप्प्यातच या गावाची निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खासदार दत्तक ग्राम म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाचगावची निवड केली होती. नागपूरपासून अवघ्या २० किमी आणि उमरेड या तालुक्याच्या ठिकाणापासून २८ किमी अंतरावर वसलेल्या पाचगावची लोकसंख्या ४९२३ असून ८२६ घरांच्या लोकवस्तीचे ठिकाण आहे. गडकरी यांनी हे गाव दत्तक घेताच तेथे विकासकामांचा धडाका लावला. देशातील पहिले वायफाय गाव होण्याचा मानही पाचगावला मिळाला. गावात ७३ योजना राबवून त्यातील ६२ योजना अर्थात ८५ टक्के काम पूर्णही झाले आहे. उर्वरित ११ कामे प्रगतिपथावर आहे. पाचगावमध्ये सामाजिक भवन, विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप, महिलांना शिवणयंत्राचे वाटप, ३५ सौरदिव्यांची व्यवस्था, अंगणवाडीचे काम, शाळा दुरुस्ती, हनुमान मंदिर परिसरात सभामंडप, १० बंधाऱ्यांची दुरुस्ती यासह विविध कामे करण्यात आली. संसद आदर्श या पाचगावात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था व्हावी यासाठी टाकी मंजूर करण्यात आली. ग्रामपंचायतमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट व्यवस्था करण्यात आली असून डिजिटल इंडियाच्या दिशेने गावाने पाऊल टाकले आहे. ई-लायब्ररीची व्यवस्था गावात करण्यात आली असून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नितीन गडकरी यांनी अ‍ॅम्बुलन्सचीही व्यवस्था केली. देशातील पहिल्या २५ गावांमध्ये पाचगावची निवड झाल्याचे पत्र केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नितीन गडकरी यांना पाठविले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात निवडलेल्या पाचगावबद्दल गडकरी यांंना शुभेच्छा देताना दुसऱ्या टप्प्यातही गावाची प्रगती व्हावी, असे नमूद केले आहे.