शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून शिक्षक शाळेत, विद्यार्थी घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:06 IST

नागपूर : नागपूरसह विदर्भातील शाळा आजपासून सुरू होत आहेत. यात शिक्षक शाळेत तर विद्यार्थी घरी असणार आहेत. पण काही ...

नागपूर : नागपूरसह विदर्भातील शाळा आजपासून सुरू होत आहेत. यात शिक्षक शाळेत तर विद्यार्थी घरी असणार आहेत. पण काही शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी घरीच आहेत. प्रशासनाकडून गेल्या सत्रातही ऑनलाईन शिक्षणावर जोर देण्यात आला होता. शिक्षकांनाही आता प्रशासनाने कोरोनाच्या विविध कामातून मोकळे केले आहे. त्यामुळे पहिली ते नववीपर्यंतच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती आवश्यक केली आहे. दहावी व बारावीच्या शिक्षकांना १०० टक्के उपस्थित राहावे लागणार आहे. मुख्याध्यापक मात्र १०० टक्के उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागात ऑनलाईन अडचण

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणारे साधन उपलब्ध नाही. बऱ्याच भागात मोबाईल कव्हरेज उपलब्ध नाही. पालकांचे मोबाईल पालक कामाला जाताना सोबत नेत असल्यामुळे मुलांना हाताळायला मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण अडचणीचे आहे.

खासगी शाळेत ‘फी’चा ऑनलाईनला फटका

खाजगी शाळेला पालकांकडून शैक्षणिक शुल्क वसूल करायचे असल्यामुळे काही प्रमाणात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ज्या पालकांनी शुल्क भरले नाही त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रुपमधून बाहेर काढून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून दूर ठेवल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

द्विशिक्षकी शाळांच्या मुख्याध्यापकांत नाराजी

शिक्षकांसाठी दररोज ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे तर मुख्याध्यापकांना १०० टक्के उपस्थितीची अट घातल्याने जिल्हा परिषदेच्या द्विशिक्षकी शाळांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. जिल्हा परिषदेच्या १५३५ शाळा असून, ८५ शाळांंमध्ये मुख्याध्यापक पद मान्य आहे. उर्वरित १४५० शाळांमध्ये ज्येष्ठ शिक्षकच मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यातील जवळपास ७० टक्के म्हणजे हजाराच्या जवळपास शाळा द्विशिक्षकी आहेत. यापैकी एका शिक्षकाकडे मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. त्यामुळे या द्विशिक्षकी शाळांमध्ये एक शिक्षक ५० टक्के उपस्थित राहणार असून एका शिक्षकाला मात्र मुख्याध्यापक म्हणून दररोज शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे. सहायक शिक्षक असूनही या शिक्षकांना मुख्याध्यापक अशी बिरुदावली लागल्यामुळे दररोज शाळेत उपस्थित रहायचे आहे. त्यामुळे हे शिक्षकांमध्ये नाराजी दिसत असून दबक्या आवाजात आपली नाराजी व्यक्त केली जात आहे.

- कोविड नियमाचे पालन करून कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही. सरसकट सर्व शाळा सुरू न करता स्थानिक विचार करून टप्प्याटप्याने उच्च प्राथमिक शाळा सुरू कराव्यात यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

- शेषराव टाकळखेडे, शिक्षक