शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाची थरारक हत्या

By admin | Updated: October 28, 2015 02:58 IST

कळमन्यात एका तरुणाची निर्घृण हत्या करून मारेकऱ्यांनी मृतदेह जाळला. मंगळवारी सकाळी ही थरारक घटना उघडकीस आल्यामुळे ..

शस्त्राचे घाव घातले : मृतदेह पेट्रोलने जाळला, मृत अन् मारेकरी अज्ञातनागपूर : कळमन्यात एका तरुणाची निर्घृण हत्या करून मारेकऱ्यांनी मृतदेह जाळला. मंगळवारी सकाळी ही थरारक घटना उघडकीस आल्यामुळे नागेश्वरनगर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, मारेकऱ्यांनी आधी या तरुणाच्या गळ्यावर, डोक्यावर, पोटावर धारदार शस्त्राचे घाव घातले. नंतर मृताची ओळख पटू नये म्हणून त्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकले. मंगळवारी सकाळी कळमन्याच्या नागेश्वरनगरात (पारडी नाका नं. ५) रेल्वे लाईनजवळ एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह पडून होता. नागरिकांनी ही माहिती कळमना पोलिसांना दिली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. मृत अंदाजे ३५ वयोगटातील होता. त्याच्या गळ्यावर, मानेवर, डोक्यावर आणि पोटावर धारदार शस्त्रांचे घाव होते. तर, मृतदेह अर्धवट जळाला होता. पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू झाले. या भागातील एका वृद्धेचा लखन ऊर्फ लारा नामक मुलगा (वाहनचालक) सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता असल्याचे कळाल्याने पोलिसांनी धावपळ करून त्या वृद्धेला घटनास्थळी आणले. मृतदेह पाहून वृद्धेने हंबरडा फोडला. त्यामुळे पोलिसांनी लारा ज्याच्याकडे काम करतो, त्या ट्रकचालकाकडे संपर्क केला. संपर्क होत नसल्यामुळे पोलिसांचा संशय पक्का झाला.(प्रतिनिधी)तो ‘लखन‘ नव्हेच !दुपारी ट्रकमालकाशी संपर्क झाला. लखन आपल्यासोबत असून आम्ही पंजाबकडे जात असल्याचे ट्रकमालकाने सांगितले. ‘त्या‘ तरुणाचे बोलणेही करून दिले. त्यामुळे या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले. वृद्धेचाही आक्रोश थांबला. तो मृतदेह कुणाचा आहे आणि त्याची हत्या करणारे कोण, त्याची पुन्हा पोलिसांनी चौकशी सुरू केली. मात्र, वृत्तलिहिस्तोवर ते स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, ज्या पद्धतीने मारेकऱ्यांनी ही हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याचे प्रयत्न केले, ते पाहता हे सराईत गुन्हेगारांचे काम असावे, असा कयास आहे. मारेकऱ्यांनी हत्या दुसरीकडे केली असावी आणि मृतदेह पारडी नाक्याजवळ आणून फेकला असावा, असाही संशय घेतला जात आहे. ठाणेदार सुनील बोंडे आणि त्यांचे सहकारी या थरारक हत्याकांडाचा तपास करीत आहेत.