शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फिरणारा तो संदेश फेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध निर्बंधांबाबतचा संदेश व्हायरल होत आहे; परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध निर्बंधांबाबतचा संदेश व्हायरल होत आहे; परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलेही नवे निर्देश जारी केले नसून त्यांच्या नावाने फिरणारा संदेश खोटा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनीच स्पष्ट केले आहे. वृत्तपत्र वापरापासून काहीही धोका नसून अशा चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा संदर्भ देऊन 'जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना' या मथळ्याखाली काही सूचनांचा संदेश व्हॉटस्‌ॲपवर टाकण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून हा संदेश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर फिरत आहे. या संदेशानुसार कुणीही बेकरी सामान, ब्रेड, पाव घेऊ नये. वृत्तपत्रे दुसऱ्या दिवशी वाचावीत, १५ दिवसांची भाजी-धान्य घरी भरून ठेवावे, ऑनलाइन फूड डिलिव्हरी पूर्णतः बंद करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, असे कुठलेही निर्देश जारी झालेले नसून हा गैरसमज व भीती पसरविण्याचा प्रकार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अशा प्रकारचे कोणतेही वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेले नाही. राज्य शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या कोविड प्रोटोकॉल सूचनेशिवाय जिल्हा माहिती कार्यालयाकडून असे कोणतेही वृत्त प्रकाशित केले जात नाही. या वृत्ताचा जिल्हा माहिती कार्यालयाशी संबंध नाही, असे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी सांगितले.

सायबर सेलकडून तपास

संबंधित पोस्ट कोणी प्रसारित केली याबाबत सायबर सेलकडे तपासणीसाठी देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमण काळात लोकांमध्ये भीती व गैरसमज पसरविणाऱ्या अन्य पोस्टवरही नजर ठेवण्याची सूचना सायबर सेलला केली आहे.