शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्र अधिकाऱ्यांसह तिघे निलंबित

By admin | Updated: February 5, 2017 02:06 IST

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या कामात हलगर्जी करणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांसह तीन

मतदान केंद्र २५ वर फेरमतदान : शिक्षक मतदार संघाची मतमोजणी आता मंगळवारी नागपूर : शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या कामात हलगर्जी करणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच संबंधित नवीन नंदनवन येथील मनपाच्या मराठी प्राथमिक शाळा या मतदान केंद्र क्रमांक २५ वर येत्या सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे, अशी माहिती नागपूरचे विभागीय आयुक्त आणि नागपूर विभागाच्या शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप कुमार यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. फेरमतदानाच्या आदेशामुळे आता या मतदार संघातील मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी होईल. सोनाली पुल्लरवार, पी.टी. लांजेवार आणि दिलीप नितनवरे असे निलंबित करण्यात आलेल्या मतदान अधिकाऱ्यांची नावे आहेत. पुल्लरवार या मतदान केंद्र अधिकारी होत्या. त्या नायब तहसीलदार आहेत. तर मतदान अधिकारी पी.टी. लांजेवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात करमणूक कर निरीक्षक व दिलीप नितनवरे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील वित्त विभागात कनिष्ठ लिपिक आहेत. अनुप कुमार यांनी सांगितले की, गुरुवारी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मतदान करताना जांभळ्या रंगाच्या शाईचा विशेष पेनाचाच वापर करणे आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. यासंदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. असे असताना मतदान केंद्र क्रमांक २५ मराठी प्राथमिक शाळा न्यू नंदनवन येथे डॉटपेनचा वापर होत असल्याची तक्रार एका मतदाराने केली. त्या तक्रारीच्या आधारावर आपण संबंधित केंद्रावर अधिकारी पाठविले. ते जेव्हा मतदान केंद्रावर पोहोचले तेव्हा त्यांना तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. मतदानासाठी जांभळ्या रंगाची शाई असलेला विशेष पेन न वापरता डॉटपेन वापरला जात होता. तसेच सुरुवातीला मात्र विशेष पेन वापरण्यात आल्याचेही निदर्शनास आले. तेव्हा चुकीच्या पद्धतीने बोटाला शाई लावण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला. अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार त्या ठिकाणी अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित मतदान केंद्रावर एकूण ५७० मतदार आहेत. ज्यावेळी हलगर्जीपणा लक्षात आला तेव्हा ४६८ मतदारांचे मतदान झाले होते. यासंदर्भात दिलीप तडस या मतदाराने लिखित तक्रार करीत पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली. यासंदर्भात आपण केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा केली. त्यांना संपूर्ण माहिती दिली. त्यांनी पुन्हा निवडणूक घेण्यास मंजुरी दिली असून, सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी संबंधित मतदान केंद्र २५ वर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात पुन्हा मतदान घेतले जाईल. (प्रतिनिधी) कॉँग्रेसचे शिक्षकांना आवाहन मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे नवीन नंदनवन येथील मनपाच्या मराठी प्राथमिक शाळा या मतदान केंद्र क्रमांक २५ वर पुन्हा मतदान होणार आहे. या केंद्रावर चुकीच्या पद्धतीने मतदान प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेसच्या वतीनेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविण्यात आली होती. त्यामुळे या केंद्रावरील शिक्षक मतदारांनी पुन्हा एकदा ६ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.बबनराव तायवाडे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल शिंदे यांनी केले आहे. संबंधित शिक्षक मतदारांना विशेष सुटी ज्या २५ क्रमाकांच्या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान होणार आहे त्या ठिकाणी एकूण ५७० मतदार आहेत. या मतदारांना पुन्हा होत असलेल्या मतदानासंबंधी प्रत्यक्ष कळविले जाईल. तसेच त्यांना पुन्हा विशेष सुटीसुद्धा दिली जाईल, असेही विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले.