शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन पोलीस शिपाई निलंबित

By admin | Updated: March 16, 2017 02:08 IST

१४ लाखांच्या जुन्या नोटा हडप करणारे नागपूर ग्रामीण मधील तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले.

अपहरण व लुटमारीचा गुन्हा दाखल : १४ लाखांच्या लुटमारीचे प्रकरण नागपूर/खापरखेडा : १४ लाखांच्या जुन्या नोटा हडप करणारे नागपूर ग्रामीण मधील तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले. शशी शेंडे, मंगेश डांगे, अमोल नागरे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून, ते नागपूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांच्यावर शनिवारी अपहरण आणि लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता. ८ मार्चला या तिघांनी खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शारिक शेख (नागपूर) आणि राजू तिरपुडे (खापरखेडा) तसेच विशाल नामक तरुण बसून असलेली कार रोखली होती. कारची झडती घेतली तेव्हा त्यात (चलनातून बाद झालेल्या) ५०० आणि १००० रुपयाच्या २८ लाखांच्या जुन्या नोटा आढळल्या होत्या. त्या नोटा जप्त करून कायदेशीर कारवाई करण्याऐवजी या पोलिसांनी शारिक, राजू तसेच विशालला धाकदपट करून भेंडाळा गावाजवळ नेले. त्यानंतर त्यातील १४ लाख रुपये या तिघांनी काढून घेतले, अन्य कोणतीही कारवाई न करता तिघांना सोडून दिले. या प्रकरणाची तक्रार शारिकने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्याकडे शनिवारी दुपारी केली. पुरंदरे यांनी लगेच पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे यांना माहिती दिली. प्रकरणाचा तपास सुरू होताच शेंडे, डांगे आणि नागरेने हे प्रकरण दडपण्यासाठी विशाल वानोडे आणि अण्णा नामक दलालांच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू होती. लोकमतने हे प्रकरण रविवारी प्रकाशित करताच प्रशासनात खळबळ उडाली. त्यानंतर रविवारला रात्री उशिरा शशी शेंडे, मंगेश डांगे, अमोल नागरे या तिघांवर कलम ३६३ (अपहरण) आणि ३९२ (लुटमार) अन्वये सावनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यासह विशाल वानोडे आणि अण्णा नामक दलालाही पोलिसांनी सहआरोपी केले आहे. वानोडे यानेच या घटनेची पोलिसांना टीप दिली होती आणि त्यानेच नंतर दोन लाखांचे आमिष दाखवून प्रकरणात खोटी माहिती देऊन या तिघांच्या बचावाचा प्रयत्न केला होता, असे तपासात उघड झाले, त्यामुळे या दोघांना अटक करण्यात आली.दरम्यान लोकमतने हे प्रकरण लावून धरले. त्यानंतर बुधवारी या तिघांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.(प्रतिनिधी)