शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मनुस्मृतीविरोधात तिघांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2016 03:07 IST

मानवी मूल्य पायदळी तुडवणाऱ्या ‘सार्थश्री मनुस्मृती’ ग्रंथावरील बंदीची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली नाही..

१५ दिवसांची मुदत संपूनही शासन गप्प का ?नागपूर : मानवी मूल्य पायदळी तुडवणाऱ्या ‘सार्थश्री मनुस्मृती’ ग्रंथावरील बंदीची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली नाही तसेच प्रकाशकावर फौजदारी कारवाई झाली नाही तर कोणत्याही क्षणी रिझर्व्ह बँक समोरच्या संविधान चौकात आत्मदहन करण्याचा इशारा तेली समाज महासंघाच्या तीन नेत्यांनी दिला आहे. डॉ. राजेंद्र पडोळे, प्रा. डॉ. रमेश पिसे आणि विलास काळे, अशी इशारा देणाऱ्या नेत्यांची नावे आहेत. या तिघांनी १५ दिवसांपूर्वी पत्रपरिषद घेऊन आत्मदहन करण्याबाबत निर्वाणीचा इशारा दिला होता. या ग्रंथात बहुजन समाजाच्या तेली, सोनार, कलार, न्हावी आदी जाती आणि महिलांबाबत हीन उल्लेख आहे. जाती समुदायात विषाची बीजे पेरून वैमनस्य निर्माण करणाऱ्या या ग्रंथावर १९९३ मध्ये २२ वर्षांपूर्वी राज्य सरकारने बंदी घातली होती. मूळ संस्कृत भाषेतील या गं्रथाचे मराठीत भाषांतर विष्णूशास्त्री बापट यांनी केलेले आहे. ते आता हयात नाहीत. बंदी असतानाही पुणे येथील रहिवासी राजेश रघुवंशी यांनी या ग्रंथाचे पुनर्प्रकाशन करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, गं्रथावरील बंदीची पुन्हा अंमलबजावणी करून होत असलेली विक्री थांबवून हे ग्रंथ जप्त करण्यात यावे, आदी मागण्या पत्रपरिषदेद्वारे करण्यात आल्या होत्या. तसेच शासनाकडे निवेदने पाठविण्यात आली होती. १५ दिवसांची मुदत संपूनही राज्य सरकारकडून कोणतीही हालचाल दिसत नसल्याने आम्ही चालू आठवड्यात कोणत्याही क्षणी आत्मदहन करू, असा पुनरुच्चार तेली समाज महासंघाचे सचिव डॉ. राजेंद्र पडोळे यांनी केला आहे.(प्रतिनिधी)