शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटीच्या फसवणूक प्रकरणात तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - आनंद साई अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटीतील चार कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - आनंद साई अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटीतील चार कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आरोपी मिलिंद नारायण घोगरे (वय ४४, रा. अयोध्यानगर), तेजस ऐसाजी कोहक (वय २४) आणि गजानन रघुनाथ नंदनवार (वय ६०, रा. श्रीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शारदा चौकात आनंद साई क्रेडिट को-ऑप. सोसायटी आहे. या सोसायटीत गुंतवणूकदारांनी ठेवलेली चार कोटी आठ लाखाची रोकड उपरोक्त आरोपींनी संगनमत करून ‌‌भंडाऱ्यात जमीन घेतल्याच्या नावाखाली दक्षायणी ग्रुप नामक संस्थेला गाळे बांधण्याकरिता दिली. हे गाळे विकून संस्थेला अर्थात गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा लाभ मिळणार असे आरोपींनी सांगितले. प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही. आरोपींच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांचा विश्वासघात करून या रकमेचा अपहार केला. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत हा घोटाळा झाला. संस्थेच्या अंकेक्षणात तो उघड झाला. दरम्यान, सोसायटीच्या सभासदांनी फसवणुकीची तक्रार नोंदविल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली. चौकशीत घोटाळ्याचे अनेक पुरावे मिळाल्यानंतर लेखा परीक्षक अशोक लालसिंग राठोड यांनी सोमवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हवालदार मीना उमाळे यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी घोगरे, कोहक आणि नंदनवार या तिघांना लगेच अटक करण्यात आली. घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत.

---