शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

त्या देयकांचे होणार फेर ‘आॅडिट’

By admin | Updated: June 26, 2015 02:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागचे प्रमुख डॉ.धर्मेश धवनकर यांनी सादर केलेल्या देयकांचे बाहेरील संस्थेकडून परत ‘आॅडिट’ करण्यात येणार आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागचे प्रमुख डॉ.धर्मेश धवनकर यांनी सादर केलेल्या देयकांचे बाहेरील संस्थेकडून परत ‘आॅडिट’ करण्यात येणार आहे. जर अंतर्गत ‘आॅडिट’च्या अहवालाच्या तुलनेत यात तफावत आढळली तर डॉ.धवनकर यांच्याविरुद्ध चौकशी करण्यात येईल असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले आहे. शैक्षणिक सहलीच्या शुल्कात विभागप्रमुखांनी घोटाळा केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी लावला होता.डॉ. धवनकर यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे तक्रार केली होती. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची अफरातफर केली नसून सादर केलेली ही देयके योग्य असल्याचा अहवाल वित्त व लेखा विभागाने सादर केला होता. या आधारावर कुलगुरूंनी डॉ.धवनकर यांना ‘क्लीन चिट’ दिली होती. कुलगुरूंनी ‘क्लीन चिट’ दिल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांमधील असंतोष कायम आहे. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व धवनकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यानंतर विद्यापीठात परत सूत्रे हलली व कुलगुरूंनी या देयकांचे बाहेरील संस्थेकडून ‘आॅडिट’ करण्याचा निर्णय घेतला. हे ‘आॅडिट’ विद्यापीठाचीच कामे पाहणाऱ्या एका संस्थेकडून करण्यात येणार आहे. अंतर्गत अहवाल व बाहेरील संस्थेचा अहवाल यांच्यात थोडी जरी तफावत आढळली तर डॉ.धवनकर यांच्याविरुद्ध चौकशी करण्यात येईल असे कुलगुरूंनी सांगितले. या ‘आॅडिट’वर विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा प्रभाव पडायला नको अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)