शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्टला पोलिसांना रेव्ह पार्टीचीच टीप होती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

लपवाछपवीनंतरही अनेक खुलासे - मद्यसाठा रजिस्टरमध्ये तफावत - रक्त नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा नरेश डोंगरे। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

लपवाछपवीनंतरही अनेक खुलासे - मद्यसाठा रजिस्टरमध्ये तफावत - रक्त नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

नरेश डोंगरे।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : थर्टी फर्स्ट पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू असल्याची पोलिसांना टीप मिळाली होती. त्याचमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्ण तयारीनिशी हॉटेल तुली इम्पेरियलमध्ये धडक दिली. मात्र, पोलिसांची रिसेप्शनमध्ये एन्ट्री झाल्याचे पाहून वरच्यावर बरीचशी लपवाछपवी झाली. त्यामुळे पोलिसांना मद्याव्यतिरिक्त दुसरे कोणते ड्रग्ज आढळले नाही. परंतु, ताब्यात घेतलेल्या ६७ जणांच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. त्यातून पार्टीत सहभागी असणाऱ्यांपैकी कुणी गांजा, एमडी अथवा दुसरे कोणते ड्रग्ज घेतल्याचे उघड झाल्यास हॉटेल व्यवस्थापनाच्या अडचणी वाढू शकतात.

शहरातील छोट्या-मोठ्या बार, हॉटेलचे दार निर्धारित वेळेनंतर उघडे दिसल्यास पोलीस त्यांच्यावर तुटून पडल्यासारखी कारवाई करतात. मात्र, तारांकित हॉटेलमध्ये कारवाईची हिंमत दाखवली जात नाही. परफेक्ट टीप मिळूनही अनेकदा कारवाईच्या नावाखाली पोलीस तारांकित हॉटेलमधून चक्कर मारून आल्यासारखे येतात. मात्र, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना तुली इम्पेरियलमध्ये थर्टी फर्स्टच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती कळताच पूर्ण तयारीनिशी हॉटेलमध्ये धडक दिली. मद्य, हुक्क्याशिवाय दुसरेही वेगळे ड्रग्ज मिळू शकतात, असा अंदाज असल्याने त्यांनी एनडीपीएसचे पथकही सोबत घेतले होते. मोठा फाैजफाटा घेऊन पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा घातला. परंतु पोलीस आल्याचे लक्षात येताच डर्टी पार्टीचे ऑर्गनायझर सतर्क झाले. त्यांनी वरच्यावर बरीचशी लपवाछपवी केली. झिंगाट झालेल्यांना तातडीने वरच्यावर रूम मिळाल्याने ३०० ते ४०० जणांपैकी केवळ ६७ जणच डर्टी पार्टीत नाचताना आढळले. त्यानंतर पोलिसांनी चार ते पाच तास तेथे कसून तपासणी केली. परंतु हुक्का आणि मद्याव्यतिरिक्त दुसरे ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले नाही. पोलिसांनी ६७ जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांनी कोणत्या प्रकारची नशा केली, त्याची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या रक्ताचेही नमुने घेतले. त्याच्या वैद्यकीय अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे. यातून त्यांच्यापैकी कुणी मद्याव्यतिरिक्त दुसरे कोणते ड्रग्ज घेतल्याचे उघड झाल्यास रेव्ह पार्टीची माहिती अधोरेखित होईल. तसे झाल्यास हॉटेल प्रशासन चांगलेच अडचणीत येऊ शकते. या संबंधाने पोलीस आयुक्तांशी संपर्क केला असता, ‘आपली बांधिलकी जनतेशी आहे. कमिटेड पुलिसिंग करायची आहे, त्यामुळे कायदेशीर कारवाईत कोणतीही कसर ठेवली जाणार नाही’, असे अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

---

हे झालेत खुलासे।

-रात्री १० नंतर बारला परवानगी नसताना ग्राहकांना मद्य देण्यात आले.

-परमिट रूमच्या मद्याच्या स्टॉकमध्ये गडबड झाली.

-परमिट रूममधून दुसरीकडे मद्यसाठा हलविला गेला.

-प्रतिबंधित असताना ग्राहकांना हुक्का देण्यात आला.

----

एक्साईजचाही निगेटिव्ह अहवाल

पोलिसांच्या कारवाईनंतर स्टेट एक्साईजच्या अधिकाऱ्यांनीही तुलीच्या विरोधात अहवाल तयार करून विभागीय गुन्ह्याची नोंद केली आहे.

हॉटेलमधील बारचे लायसन्स मोहब्बतसिंग तुली यांच्या नावे आहे. मद्यसाठ्याची तपासणी केली असता रजिस्टरच्या नोंदी आणि प्रत्यक्ष मिळालेल्या साठ्यात सर्व प्रकारच्या अनेक बाटल्या कमी आढळल्या आहेत. हा अहवाल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याची माहिती एक्साईजचे एसपी प्रमोद सोनोने यांनी लोकमतला दिली.

---