शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

‘थर्टी फर्स्ट’ला गुन्हेगारांचा हैदोस

By admin | Updated: January 2, 2017 02:00 IST

मावळत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो नागपूरकर शनिवारी सज्ज होते.

नागपूर : मावळत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो नागपूरकर शनिवारी सज्ज होते. सर्वत्र उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण होते. या उत्साहावर विरजण पडू नये म्हणून पोलीसही सज्ज होते. रस्त्यारस्त्यावरून धावणारी पोलिसांची वाहने आणि जागोजागी पोलिसांचा प्रचंड ताफा कडक बंदोबस्ताची साक्ष देत होता. मात्र, त्याला न जुमानता गुंड त्यांच्याच शैलीत होते. त्याचमुळे गणेशपेठेत एकाचा खून झाला. यशोधरानगरात गोळीबार झाला. तहसीलमध्ये तलवारीचा हल्ला करून खंडणीची मागणी केली. सोनेगावात चेनस्रॅचिंग घडली. तर सक्करदऱ्यात गुंडांनी तोडफोड केली. मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ ते रात्री ११.३० च्या दरम्यान घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांनी नव्या वर्षात कर्तव्यकठोर बनण्याची गरज अधोरेखित केली आहे. यशोधरानगरात गोळीबार संघर्षनगरात क्षुल्लक कारणावरून संघर्ष क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात गुन्हेगारांनी एकाला बेदम मारहाण केली. तर, मदतीला धावलेल्या त्याच्या भावावर गोळी झाडली. सुदैवाने नेम चुकल्यामुळे मोहम्मद आसिफ अंसारी (वय २५) या तरुणाचा जीव वाचला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री १०.३० वाजता ही थरारक घटना घडली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. शनिवारी रात्री संघर्षनगरातील मैदानाजवळ एक लग्नसमारंभ होता. त्यात मोहम्मद राशिद ऊर्फ गोलू आपल्या नातेवाईक, मित्रमंडळीसोबत सहभागी झाला होता. येथे मोहम्मद फैजान ऊर्फ फैजूल (वय २१) मोहम्मद ऐहफाज (वय २०), फिरोज खान ऊर्फ सोनू (वय २३) आणि शेख शहजाद ऊर्फ पप्पू (रा. संघर्ष नगर, मेहबुबपुरा) हेसुद्धा आले होते. राशिदचा या चौघांतील एकासोबत वाद झाला. त्यांनी एकमेकांना मारहाण केली. त्यानंतर आरोपी धावले. त्यांनी राशिदला लाथाबुक्क्यांनी बदडणे सुरू केले. ते पाहून राशिदचा भाऊ मोहम्मद आसिफ अन्सारी (वय २५, रा. संघर्षनगर) भांडण सोडवायला गेला. आरोपींनी त्यालाही मारहाण केली आणि पिस्तूलातून आसिफवर गोळी झाडली. सुदैवाने नेम चुकल्याने पहिली गोळी हवेत वाकडीतिकडी गेली तर दुसरी गोळी झाडताना पिस्तूल लॉक झाले. त्यामुळे ती गोळी खाली पडली आणि आसिफचा जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. धावपळ आणि गोंधळामुळे समारंभातील पाहुण्यांनी कार्यक्रमस्थळावरून काढता पाय घेतला. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. आसिफच्या तक्रारीवरून एपीआय बांदेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर फैजूल, ऐहफाज आणि फिरोजला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले. तर, रविवारी सकाळी पप्पूलाही अटक करण्यात आली.(प्रतिनिधी) पिस्तूल कुणाकडून आणले ? मावळत्या वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील सर्वच भागात पोलिसांचा चांगल्यापैकी बंदोबस्त होता. मात्र, त्याला न जुमानता आरोपींनी गोळीबार करून आसिफचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील आरोपींचा काही कुख्यात गुन्हेगारांशी संबंध आहे. हवालाची रोकड लुटणारा अन् काही दिवसांपूर्वी कत्तलखान्यात नेणारी जनावरे वाचविणाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांसोबतही हे प्रकरण जोडले जात आहे. आरोपींनी त्या गुन्हेगारांकडूनच पिस्तूल आणले असावे, अशी चर्चा आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.