शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

चोरटे मानेना ! - पोलीस हतबल : घरफोड्यांची मालिका सुरूच

By admin | Updated: April 20, 2015 02:07 IST

शिरजोर झालेले चोरटे मानता मानायला तयार नाहीत. उपराजधानीत त्यांचा हैदोस सुरूच आहे.

नागपूर : शिरजोर झालेले चोरटे मानता मानायला तयार नाहीत. उपराजधानीत त्यांचा हैदोस सुरूच आहे. गेल्या २४ तासात त्यांनी पुन्हा चार ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास केला. चार पैकी दोन गुन्हे प्रतापनगरातील आहे, हे येथे उल्लेखनीय!भांगेविहार कॉलनीतील आशिष नीळकंठराव जाधव (वय ३१) यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९५ हजारांचे दागिने लंपास केले. १६ एप्रिलला आशिष नीळकंठराव जाधव हे कामानिमित्त तर त्यांची आई देवदर्शनासाठी बाहेरगावी गेली होती. चोरट्यांनी १६ ते १७ एप्रिलच्या दरम्यान जाधव यांच्या दाराचा कडीकोंडा तोडला आणि ९५ हजारांचे दागिने लंपास केले. दुसरी घटना श्रद्धानंदपेठ परिसरात घडली. राजेंद्र नामदेव देवासे (वय ४६) यांचा श्रद्धानंदपेठमध्ये फोटो स्टुडिओ आहे. शनिवारी सायंकाळी ६.३० ला त्यांनी स्टुडिओ बंद केला. रविवारी सकाळी १०.३० वाजता ते स्टुडिओ उघडण्यासाठी आले असता त्यांना शटरचे कुलूप तुटून दिसले. चोरट्यांनी आतमधून ८० हजार किंमतीचे दोन कॅमेरे चोरून नेले. देवासे यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. सुगतनगरातही मारला हात सुगतनगरातील मीना राजेंद्र गावंडे (वय ५५) यांच्या घरातूनही चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि सिलिंडरसह ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. गावंडे यांची मुलगी बेझनबागमध्ये राहाते. शनिवारी रात्री ११ वाजता त्या आपल्या मुलीच्या घरी गेल्या. रविवारी सकाळी १० ला परतल्या तेव्हा ही घरफोडीची घटना उघडकीस आली. गावंडे यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशाच प्रकारे हुडकेश्वरमधील न्यू नरसाळा मार्गावर राहाणारे ईश्वर गणपतराव येवले (वय ५४) यांच्या दाराची पाटी तोडून चोरटे आतमध्ये शिरले आणि रोख ३५ हजार तसेच सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ७६, ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. १७ एप्रिलला येवले आपल्या मुलीच्या घरी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी हात मारला. रविवारी सकाळी ७ ला ही घरफोडी उघडकीस आली. हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. (प्रतिनिधी)