शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्या महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील दागिने आणि रक्कम चोरणाऱ्या एका महिलेला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील दागिने आणि रक्कम चोरणाऱ्या एका महिलेला प्रतापनगर पोलिसांनी अटक केली. वंदना मंगल लोंधे (वय ३८) असे तिचे नाव आहे. ती अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगीनगर, टोली भागात राहते. हिंगणाजवळच्या गुमगाव येथे राहणाऱ्या मंगला घनाशाम चरडे (वय ४३) या त्यांचा भाचा अभिजित वरभे यांच्याकडे लग्नासाठी आल्या होत्या. लग्न आटोपल्यानंतर शुक्रवारी दुपारी ११.५० ते १२. २० च्या दरम्यान गुमगावला जाण्यासाठी स्नेहनगर, छत्रपती चाैक बसथांब्याजवळ आल्या. येथे बसमध्ये बसताना आरोपी महिला वंदना लोंधे हिने त्यांची नजर चुकवून पर्सची चेन उघडली. पर्समधून रोख २ हजार आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख, ९ हजारांचा ऐवज चोरला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंगला चरडे यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार दिनकर ठोसरे यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. या भागात टोलीतील चोरट्या महिलांची टोळी घुटमळताना दिसताच सहा जणींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यातील चोरट्या वंदनाला मंगला यांनी ओळखले. त्यामुळे चोरीचा गुन्हा दाखल करून प्रतापनगर पोलिसांनी तिला अटक केली.

---

तीन दिवसाची कोठडी

वंदना लोंधेला पोलिसांनी आज न्यायालयात हजर करून तिचा १३ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला. अशा प्रकारे बसमध्ये, धावत्या ऑटोत आणि गर्दीच्या ठिकाणी महिला - पुरुषांची रक्कम तसेच दागिने लांबविणारी एक मोठी टोळी गेल्या अनेक वर्षांपासून शहरात सक्रिय आहे. वंदनाची कसून चाैकशी केल्यास अनेक गुन्हे उजेडात येऊ शकतात.

---