शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कॅटरर्ससह तिघांवर गुन्हे कुणालाही अटक नाही

By admin | Updated: December 4, 2015 03:16 IST

अमरावती मार्गावरील मराठा लॉनमध्ये बुधवारी रात्री झालेल्या कॉफी मशीन स्फोट प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी कॅटरर्ससह तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

कॉफी मशीनचा स्फोटनागपूर : अमरावती मार्गावरील मराठा लॉनमध्ये बुधवारी रात्री झालेल्या कॉफी मशीन स्फोट प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी कॅटरर्ससह तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. ब्रिजेश रामरूप मिश्रा (वय ३३, रा. न्यू कैलासनगर), फारुख शेख इस्माईल (वय २१, रा. पार्वतीनगर अजनी) आणि देवेंद्र लक्ष्मण परिहार (वय २३, रा. अजनी) अशी आरोपींची नावे आहेत. मराठा लॉनमध्ये बुधवारी रात्री ८.३० ला सुरू असलेल्या लग्न समारंभात अचानक कॉफी मशीनचा स्फोट झाला. त्यामुळे किरण अरुण तारेकर (वय ५२, रा. तुळशीबाग, राणी इंदिराबाई भोसले विहार, महाल), त्यांची मुलगी श्रद्धा (वय १९) आणि पुतणी श्रावणी कल्पेश तारेकर (वय १०) या तिघांना जबर दुखापत झाली. श्रावणीच्या डाव्या हाताच्या पंजासह पोटालाही जबर जखमा झाल्या तर, अन्य चार ते पाच जणांना जखमा झाल्या. या स्फोटामुळे लग्न समारंभाचे आनंदाचे वातावरण बदलले. तेथे रडारड, धावपळ सुरू झाली. बराच वेळपर्यंत स्फोटाचे कारण लक्षात आले नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेलाही उधाण आले. दरम्यान, माहिती कळताच अंबाझरी पोलीस, गुन्हेशाखेचे पथक, बीडीडीएसही पोहचले. जखमींना रुग्णालयात हलविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून कॉफी मशीन आणि अन्य काही चिजवस्तू जप्त केल्या. त्यानंतर अंबाझरी ठाण्यात मिश्रा, फारुख आणि परिहारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.