रिटायरींग रूममध्ये चोरी : कपडे, रोख, एटीएम, सर्व्हिस बुकची बॅग पळविलीनागपूर : नागपुरात शिकणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी हिंगोलीच्या अंध विद्यालयातील कर्मचारी नागपुरात आला. रिटायरींग रूम बुक केली. कपडे काढून आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेला. तेवढ्या वेळात अज्ञात आरोपीने त्यांची कपडे, रोख रक्कम असलेली बॅग घेऊन पळ काढला. आंघोळ करून परतल्यानंतर बॅग चोरीला गेल्याचे समजताच त्याला धक्का बसला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत बॅगचा शोध घेत रेल्वेस्थानकावरउघडे फिरण्याची पाळी या प्रवाशावर आली. संजय बोहरा (४५) रा. हिंगोली हे अंध विद्यालयात कार्यरत आहेत. ते दुपारी १.३० वाजता नागपुरात आले. नागपुरातील एस. बी. जैन इंजिनिअरींग स्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलीला भेटण्यास जाण्यापूर्वी त्यांनी रिटायरींग रुम बुक केली. आंघोळ करायला जाण्यापूर्वी त्यांनी आपले कपडे बॅगमध्ये ठेवले. अज्ञात आरोपीने संधीचा फायदा घेऊन त्यांची बॅग पळविली. आंघोळ करून आल्यानंतर बॅग चोरीला गेल्याचे कळताच त्यांना धक्का बसला. बॅगमध्ये २५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल, ३ एटीएम कार्ड, सर्व्हिस बुक आणि रोख ८ हजार रुपये होते. (प्रतिनिधी)भाच्याने आणले टी शर्ट आणि बर्मुडाकपडेच चोरीला गेल्यामुळे बनियन आणि टॉवेलवर बाहेर कसे पडावे हा प्रश्न होता. बॅगमध्ये मोबाईल असल्यामुळे फोन करण्याची मुभा नव्हती. अखेर त्यांना मुलीचा मोबाईल आठवला. त्यांनी मुलीला फोन लावून घडलेला प्रकार सांगितला. नागपुरात त्यांचा भाचा राहतो. मुलीने त्यांच्या भाच्याला फोन करून घालण्यासाठी कपडे आणण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचा भाचा टी शर्ट आणि बर्मुडा घेऊन लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचला.
प्रवाशावर आली उघडे फिरण्याची पाळी
By admin | Updated: August 9, 2015 02:40 IST