शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

फक्त होती जगण्याची इच्छाशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:08 IST

अभय लांजेवार उमरेड : अचानक प्रकृती बिघडली. कोरोनाची लक्षणे दिसू लागली. कोरोना टेस्ट केली. पॉझिटिव्ह आली. अत्यंत गरीब आणि ...

अभय लांजेवार

उमरेड : अचानक प्रकृती बिघडली. कोरोनाची लक्षणे दिसू लागली. कोरोना टेस्ट केली. पॉझिटिव्ह आली. अत्यंत गरीब आणि हलाखीची परिस्थिती. ना हातात पैसा ना जवळ कुणी नातेवाईक. अशातच हितचिंतक मित्राला फोन केला. त्याने उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये औषधोपचाराचा सल्ला दिला. एचआरसीटी स्कोर होता २१ आणि ऑक्सिजन लेव्हल होती ६५. अशाही विपरीत परिस्थितीवर मात करीत मंगळवारी अड्याळवाले ले-आऊट येथील मारोती नामदेव वाघमारे (५७) हे कोरोनामुक्त होऊन घरी पोहोचले. त्यांच्या जगण्याच्या हिमतीमुळे आणि डॉक्टरच्या योग्य आणि अचूक औषधोपचारामुळेच ते घरी परतल्याने कुटुंबीय आनंदाने न्हाऊन निघाले.

मारोती वाघमारे यांचे भाजीपाला विक्रीचे छोटेसे दुकान आहे. अत्यंत मनमिळावू असलेले मारोतराव तापाने फणफणले. खोकला आणि अन्य त्रास सुरू झाला. लागलीच त्यांनी कोविड टेस्ट केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. कुटुंब धास्तावले. कशीबशी रकमेची जुळवाजुळव करीत नागपूर येथे सिटीस्कॅनसाठी नेण्याचा निर्णय झाला. नागपूरला प्रवास आणि सिटीस्कॅन असा संपूर्ण खर्च १७ हजार रुपयाचा आला.

सिटीस्कॅनमध्ये २१ स्कोर निघाला. मुलगा दीपक घाबरला. मेडिकलमध्ये नेले तर पाय ठेवायला जागा नाही. खासगी दवाखान्यासाठी पैसा नाही. अशातच आता वडिलांना घरीच क्वॉरंटाईन ठेवू. औषधोपचार करू, असा निर्णय पक्का करीत उमरेडच्या दिशेने निघाले. अर्ध्यावर प्रवासात असताना नगरसेवक सतीश चौधरी यांना परिस्थिती सांगितली. सतीश चौधरी यांनी त्यांना घरी न नेता उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये औषधोपचाराचा सल्ला दिला. डॉ. स्वप्निल सहारकर यांच्याशी संपर्क साधला. तातडीने अ‍ॅडमिट केल्या गेले. प्राणवायू मिळाला. औषधोपचार नियमित सुरू झाले. डॉ. सहारकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अनेकांनी हिंमत दिली. सोमवारपासून मारोती वाघमारे यांच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झाल्याने अखेर आज सुटी घेण्याचा निर्णय झाला. आता विना ऑक्सिजन त्यांची लेव्हल ९६ आली आहे.

--

पैसा अनेकांजवळ असला तरी बेड मिळत नाही. वेळीच ऑक्सिजनची सुविधाही नाही. व्हेंटिलेटर मिळण्यासाठीही बराच विलंब होतो. कोविड सेंटरमध्ये बाजूच्याच खाटेवरील माणस मरतात. तेव्हा आजूबाजूचे खचतात. अशाही विपरीत परिस्थितीत मारोती वाघमारे यांची हिंमत लाखमोलाचीच आहे.

सतीश चौधरी

नगरसेवक, नगरपालिका उमरेड

--

एकमेकांना हिंमत आणि आत्मविश्वास वाढविण्याचे काम आता सर्वांनी केले पाहिजे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर घाबरून जाऊ नये. योग्य काळजी. औषधोपचाराने बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आम्ही सर्वजण रुग्णांच्या सेवेत अविरत आहोतच.

डॉ. स्वप्निल सहारकर

वैद्यकीय अधिकारी, उमरेड

--